Farah Khan Visit to Shahida Ansari Home : बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा यूट्यूब व्लॉग्समुळे अधिक चर्चेत आहे. फराह खान आणि तिचा कुक दिलीप यांच्यातील मजेदार केमिस्ट्रीमुळं ते दोघेही युट्युबवर अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्यातील मजेदार संवाद प्रेक्षकांना आवडतात. फराह या व्लॉग्समध्ये तिचा कूक दिलीपसोबत वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या आणि इन्फ्लूअन्सरच्या घरी जाताना दिसते. आता फराहचा नवा व्लॉग चांगलाच चर्चेत आलाय.
फराह खान नुकतंच मुंबईतील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शाहिदा अंसारी हिच्या घरी पोहोचली. तिच्या या एपिसोडला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शाहिदाने फराहला आपल्या घरी आलू भाजी बनवून खायला दिली. फराह, शाहिदा आणि तिचा कुक दिलीप यांनी मिळून ही रेसिपी तयार केली आणि नंतर एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला.
फराहने शाहिदाशी तिच्या संघर्षाबद्दल संवाद साधला. शाहिदाने सांगितले की, तिला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. तिच्या पतीने तिच्यासाठी इन्स्टाग्राम अकाउंट तयार केलं आणि तिने तिथून कंटेंट बनवायला सुरुवात केली. लोकप्रिय होण्यासाठी तिला तब्बल आठ वर्षे लागली.
फराहने तिच्या घरातील परिस्थितीबद्दल विचारले असता शाहिदाने सांगितले की, त्यांच्या घरी पाच जण राहतात. यावर फराहनेही आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली. ती म्हणाली की, "मी सुद्धा माझ्या आई आणि भाऊ साजिद खान यांच्यासोबत एका छोट्याशा खोलीत पाच वर्षे राहिले होते. ते आमच्या आत्यांचं स्टोअर रूम होतं". फराह खानचा हा कुकिंग व्लॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी या एपिसोडचं कौतुक करत हा एपिसोड सेलिब्रिटी एपिसोडपेक्षा खूपच चांगला आहे. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर याला आतापर्यंतचा 'बेस्ट एपिसोड' म्हटलं आहे.
Web Summary : Farah Khan's YouTube vlog features her visit to social media influencer Shahida Ansari's Mumbai slum home. They cooked together, shared a meal, and discussed Shahida's journey. Farah also reminisced about her own humble beginnings, living in a small room with her family.
Web Summary : फराह खान के यूट्यूब व्लॉग में सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शाहिदा अंसारी के मुंबई स्थित झुग्गी बस्ती वाले घर का दौरा शामिल है। उन्होंने साथ में खाना बनाया, भोजन साझा किया और शाहिदा की यात्रा पर चर्चा की। फराह ने अपने संघर्ष के दिनों को भी याद किया, जब वह अपने परिवार के साथ एक छोटे से कमरे में रहती थीं।