Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वो स्त्री है, कुछ भी कर सकती है' , ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर प्रचंड ट्रोल होतेय श्रद्धा कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 16:25 IST

ड्रग प्रकरणात श्रद्धाचे नाव आल्याने लोक चकित आहेत. श्रद्धा कपूरचे नाव समोर आल्यानंतर अनेकांना विश्वासच बसला नाही. मात्र सोशल मीडियावर तिच्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

श्रद्धा कपूरच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.सिनेमातील तिच्या अदाकारीने रसिकांची भरघोस पसंतीही मिळवली. अल्पावधीत रसिकांची मनं जिंकणारी श्रद्धाने मात्र तिच्या चाहत्यांना मात्र नाराज केले. ड्रग प्रकरणात श्रद्धाचे नाव आल्याने लोक चकित आहेत. श्रद्धा कपूरचे नाव समोर आल्यानंतर अनेकांना विश्वासच बसला नाही. मात्र सोशल मीडियावर तिच्याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

 

सोशल मीडियावर श्रद्धावर प्रचंड टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे तिला जबरदस्त ट्रोलही केले जात आहे. युजर्सही राग व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे तिची खिल्ली देखील उडवताना दिसत आहे.

एका युजरने तर ''वो स्त्री है, कुछ भी कर सकती है.'’ म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. तर एका युजरनेही शक्ती कपूरचा फोटो शेअर करत लिहिले, ‘म्हारी छोरियां, छोरों से कम है के’.

श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड

जयाकडे एनसीबी सलग गेले तीन दिवस सखोल चौकशी करीत आहे. क्वान कंपनीच्या दहा भागीदारांपैकी एक असलेल्या जयाचे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट तपासून तिच्याकडे ड्रग्जबाबत चौकशी सुरू आहे. तिने श्रद्धा कपूरसाठी भारतात प्रतिबंधित ‘सीबीडी आॅइल’ची आॅनलाइन तजवीज केल्याची कबुली दिली.

 

याशिवाय रिया चक्रवर्ती, सुशांत, चित्रपट निर्माता मधू मांटेना, स्वत:साठीही सीबीडी आॅइल मागविले होते. मात्र आतापर्यंत कोणत्याही ड्रज तस्कराशी संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले. नैराश्यात असल्याने अनेक कलाकार ड्रग्जच्या आहारी गेल्याचे तिने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शक्ती कपूरची मुलगी म्हणून नाही तर फेसबुकमुळे मिळाला पहिला ब्रेक

अभिनय क्षेत्रातून बालिवूडमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळी श्रद्धा कपूर ही  अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी असल्याचे फार कमी लोकांना माहिती होतं. तीन बत्ती सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिग्दर्शकाने तिचा फोटो फेसबुकवर पाहिला होता. फोटो पाहून ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. आज जसे सिनेमा येण्याआधीच स्टार किडस लोकप्रिय होतात. तशी तिची सुरूवात ही स्टारकिड्सप्रमाणे झालीच नसल्याचे तिने सांगितले होते.

 

 

माझे सुरूवातीचे दोन्ही सिनेमा फ्लॉप झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुणाचीली मुलं असू द्या, तुमचं काम चांगलं असेल तरच तुम्हाला स्वीकारलं जातं. तुमचं कामच त्याची पोचपावती देतं. स्वतःमध्ये बदल करणं हेच माझ्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक आहे. तोच तोचपणा राहिला की आयुष्य रटाळवाणं वाटू लागतं. त्यामुळे स्वतःला आव्हान देत नवनवीन गोष्टी करत राहणं गरजेचं वाटतं असे तिने सागितले होते. 

टॅग्स :श्रद्धा कपूर