Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवरा असावा तर असा! कुणालाही जमणार नाही ते निक जोनासने केलं, हातात दिसलं प्रियांका चोप्राचं मंगळसूत्र; होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:26 IST

निकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. निकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. निक हा भारताचा लाडका जावई आहे. पण सध्या एका वेगळ्याच कारणाने निक जोनास चर्चेत आहे. निकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. निकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

निकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो प्रियांकाच्या 'द ब्लफ' या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे. या व्हिडीओत तो ब्रेकफास्ट बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. निकच्या या व्हिडीओमध्ये त्याच्या हातात चाहत्यांना प्रियांकाचं मंगळसूत्र दिसलं. जे पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. निकला चाहत्यांनी ग्रीन फ्लॅग नव्हे तर ग्रीन फॉरेस्ट म्हटलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत निक जोनासचं कौतुक केलं आहे. "तुम्ही ते मंगळसूत्र पाहिलं का? निक जोनास ग्रीन फॉरेस्ट आहे", "त्याने मंगळसूत्राचं ब्रेसलेट घातलंय यार", "त्याने हातात मंगळसूत्र घातलंय", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

निक जोनास हा लोकप्रिय सिंगर आहे. २०१८ मध्ये प्रियांका आणि निकने लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर प्रियांका निकसोबत परदेशात स्थायिक झाली आहे. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव मालती असं आहे. निक प्रियांकाबाबत अनेकदा सोशल मीडियावरुन प्रेम व्यक्त करताना दिसतो. याशिवाय तिच्याबरोबरच फोटोही तो शेअर करत असतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nick Jonas Wears Priyanka Chopra's Mangalsutra, Wins Hearts: Details Here

Web Summary : Nick Jonas is winning hearts after a video surfaced showing him wearing Priyanka Chopra's mangalsutra. Promoting Priyanka's film, 'The Bluff', Nick was seen cooking breakfast. Fans noticed the mangalsutra bracelet, praising Nick's sweet gesture and love for Priyanka.
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास