Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीवर चाहते भडकले, भारतात परतलीस तर याद राख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 12:34 IST

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं.

कोरोनाने अमेरिकेचे कंबरडे मोडले आहे. सर्वाधिक कोरोना रूग्ण आता अमेरिकेत आहे. कोरोनाने अमेरिके हतरबल झाली आहे. तरीही बॉलिवूडच्या या बेबी डॉलला भारतात असुरक्षित वाटत होते. भारतापेक्षा अमेरिकाच सुरक्षित म्हणून लॉकडाऊनदरम्यान आपल्या मुलाबाळांसह सनी लिओनी अमेरिकेत गेली. भारतातील परिस्थिती पाहता माझ्या मुलांचा विचार करून आम्ही अमेरिकेत येण्याचा निर्णय घेतला असं तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने म्हटले होते.

सध्या  लॉस एंजिलिसमध्ये ती आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. अमेरिकेत सुरक्षित असूनही सनीला पुन्हा भारतातही परतायचे असल्याचे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं. मात्र सनीवर तिचे चाहते प्रचंड टीका आणि संतप्त झाले आहेत.  

तिच्या पोस्टवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, 'ज्या देशातल्या लोकांनी तुला मोठं केलं, चित्रपटांमध्ये काम दिलं,जिथं पैसा कमावला', त्या देशाला तू असुरक्षित कसं म्हणू शकतेस? असा प्रश्नही तिला विचारला आहे.

एका युजरने तर सनी सारख्या लोकांनी तर अमेरिकेतच राहवे, परत आलीस तर याद राख अशा शब्दांत सुनावले आहे. त्यामुळे सनीची ही चुक तिला चांगलीच महागात पडणार असेच दिसते आहे. भारतात परतली तरी पुन्हा रसिकांचं तेच प्रेम तिला मिळेेल का? हा ही मोठा प्रश्न आहे.

कोरोना भारतातू जाईल पण सनीसाठी आता भारतीयांनी कायमचे दरबाजे बंद केले आहे अशीच परिस्थिती सध्या तिच्यासाठी उद्भवली आहे.

टॅग्स :सनी लिओनी