Join us  

'भावा मला Amazon Prime च्या मेंबरशीपसाठी मदत कर ना'; चाहत्याच्या मागणीवर सोनू सूद म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 9:07 PM

काहीजण सोनूकडे इतर वैयक्तिक मदतही मागत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केली होती. सोनू सूद अजूनही अडचणींमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करत आहे. सोनू सूद हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. अनेकजण सोनूला ट्वीटर वर टॅग करत मदत मागितल्याची उदाहरणे आहेत. मात्र काहीजण सोनूकडे इतर वैयक्तिक मदतही मागत असल्याचे दिसून येत आहे.

एका पठ्याने ट्विटरद्वारे सोनू सूदकडे एक अनोखी मागणी केली आहे. एका चाहत्याने ट्विट करत म्हटले की, सोनू सूद भावा, मला अ‍ॅमेझोन प्राईमची 1 वर्षाची मेंबरशीपसाठी मदत कर ना. मी व्ही मूव्हीची वाट पाहतो. चाहत्याच्या या ट्विटला प्रतिसाद देत सानूने देखील मजेशीर उत्तर दिल आहे. 

चाहत्याच्या या मागणीवर मेंबरशीपसोबत मी तुला टीव्ही, एसी आणि पॉपकोर्न पण पाठवतो, असं मजेशीर उत्तर दिलं आहे. सोनू सूदचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात देखील सून सूदकडे एका चाहत्याने अजब मागणी केली होती. भाई, मला कुठे तरी सोड मला गर्लफ्रेंडसोबत पळून जायचंय. तो एवढ्यावरच थांबला नाही तर अंदमान किंवा निकोबारला मला सोड अशी मागणी केली होती. यावर माझ्याकडे यापेक्षा चांगली आयडिया आहे. तुमच्यासोबत मी तुमच्या कुटुंबियांना देखील पाठवू का? लागलीच लग्न देखील होऊन जाईल, असं मजेशीर उत्तर सोनू सूदने दिलं होतं. 

अन्य महत्वाच्या बातम्या- 

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

 

टॅग्स :सोनू सूदट्विटरमहाराष्ट्रमुंबईबॉलिवूड