Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋतिक रोशनच्या त्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं, ट्विट होतंय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 19:09 IST

या फोटोत ऋतिक दोन मुलांसोबत बाल्कनीमध्ये उभा आहे.

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहे. लॉकडाऊनमध्ये ऋतिकची पत्नी ही त्याच्या घरी रहायला आली आहे.  ऋतिकने सोशल मीडियावर मुलांसोबतचा  फोटो  शेअर केला आहे. या फोटोत ऋतिक दोन मुलांसोबत बाल्कनीमध्ये उभा आहे. 

या फोटोत एका यूजरने ऋतिकच्या हातात सिगरेट बघितली आणि त्याला प्रश्न विचारला, ''ऋतिकच्या हातात सिगरेट आहे की मी काही चुकीचे बघतोय ?, मला आशा आहे की असे होणार नाही कारण यामुळे मला खूप वाईट वाटेल.'' यावर ऋतिकने त्याला लगेच उत्तर दिले आहे. ऋतिक म्हणतो, 'मी धूम्रपान न करणारा व्यक्ती आहे. जर मी क्रिश असतो तर सगळ्यात आधी या विषाणूचा खात्मा करुन या ग्रहावरील प्रत्येक सिगारेट नष्ट केली असती.''  

ऋतिक रोशनने हे उत्तर देत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ऋतिकचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होते आहे. 

लॉकडाऊनमुळे ऋतिक सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवित आहेत. सोशल मीडियावरदेखील तो चांगलाच अॅक्टिव्ह झाला आहे. तसेच तो काम सिनेमांची स्क्रिप्ट वाचण्याचे काम देखील करतो आहे. सध्या ऋतिककडे अनेक सिनेमांच्या स्क्रिप्ट आहेत.

टॅग्स :हृतिक रोशन