Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता!! बादशाहने चाहतीला दिलं १ लाख ५० हजारांचं गिफ्ट; कारण आहे खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 15:23 IST

Badshah: दरवेळी बादशाहला चाहत्यांकडून गिफ्ट्स मिळतात. परंतु, यावेळी त्याने एका चाहतीला गिफ्ट दिलं आहे.

कलाकार आणि चाहते यांचं एक खास नातं आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या सेलिब्रिटींसाठी चाहते कायम काही ना काही हटके करत असतात. यात बऱ्याचदा हे चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींना खूश करण्यासाठी भेटवस्तू वगैरे देत असतात. परंतु, प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाह (Rapper And Singer Badshah) याच्या बाबतीत हे मात्र उलट झालं आहे. दरवेळी बादशाहला चाहत्यांकडून गिफ्ट्स मिळतात. परंतु, यावेळी त्याने एका चाहतीला गिफ्ट दिलं आहे. विशेष म्हणजे हे गिफ्ट साधंसुधं नसून चक्क १ लाखांचं आहे.

सध्या सोशल मीडियावर बादशाह त्याच्या दर्यादिल स्वभावामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात बादशाहने त्याच्या १५ वर्षाच्या चाहतीसाठी १ लाख ५० हजारांचे ब्रँडेड शूज गिफ्ट केले आहेत. या चाहतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली.

अलिकडेच एका युट्यूब फॅन फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बादशाहने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बादशाहने त्याचे १ लाख ५० हजारांचे व्हर्जिल आबलोह-डिझाइनचे लुई व्हिटॉनचे स्निकर्स तिला भेट म्हणून दिले. विशेष म्हणजे हे शूज तो स्वत: वापरत होता. मात्र, चाहतीच्या प्रेमापुढे त्याने त्याचे शूज काढून तिला भेट दिले. हे शूज मुंबईत राहणाऱ्या १३ वर्षीय मोनिका बोहरा या चाहतीला मिळाले असून तिने लगेचच सोशल मीडियावर याविषयी पोस्ट लिहिली.

दरम्यान, मोनिकाच्या वाढदिवशीच तिला बादशाहकडून हे गिफ्ट मिळाल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यावर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. इतकंच नाही तर अनेकांनी बादशाहच्या या वागण्याचं कौतुकही केलं आहे.

टॅग्स :बादशहासेलिब्रिटीबॉलिवूड