Join us

​बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याचेदेखील याच दिवशी झाले होते निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 14:51 IST

विनोद खन्ना हे गेले कित्येक दिवसांपासून आजारी असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांना कॅन्सर झाला असला तरी ते कित्येक महिन्यांपासून ...

विनोद खन्ना हे गेले कित्येक दिवसांपासून आजारी असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांना कॅन्सर झाला असला तरी ते कित्येक महिन्यांपासून या आजाराला झुंज देत होते. दरम्यानच्या काळात त्यांचे वजन प्रचंड कमी झाले होते. त्यांना ओळखणेदेखील कठीण झाले होते. त्यांचा रुग्णालयातील एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून त्यांच्या सगळ्याच फॅन्सना धक्का बसला होता. पण अखेरीस त्यांची आज प्राणज्योत मालवली.चित्रपटसृष्टीत काम करत असताना अनेक नायिकांसोबत विनोद खन्ना यांची जोडी गाजली. पण त्याचसोबत अनेक नायकांसोबतदेखील त्यांची जोडी प्रचंड गाजली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी मुक्कदर का सिकंदर, परवरिश, हेरा फेरी, अमर अकबर एन्थॉनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याकाळात त्यांना अमिताभ यांच्यापेक्षा अधिक मानधान मिळत असल्याचेदेखील म्हटले जाते. अमिताभ यांच्यासोबतच त्यांची फिरोज खान यांच्यासोबत जोडी गाजली.विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी कुरबानी, शंकर शंभू, दयावान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे कुरबानी, दयावान सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ गाजले होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून ते दोघे खऱ्या आय़ुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि विशेष म्हणजे विनोद खन्ना यांचे निधन 27 एप्रिल 2017ला झाले तर फिरोज खान यांचे निधन बरोबर आठ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 27 एप्रिल 2009 ला झाले होते. कुरबानी या चित्रपटातील इश्वर का दुसरा नाम दोस्ती है हा संवाद आज त्यांच्यासाठी तंतोतत खरा ठरला आहे.