Join us
Daily Top 2Weekly Top 5

fake or real अतिसुंदर दिसण्याच्या नादात अशी दिसायला लागली होती श्रीदेवी, फोटो पाहून बसला होता चाहत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:46 IST

कोट्यवधीचे मानधन घेणा-या श्रीदेवी यांचा खर्चसुद्धा तितकाच होता. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करायच्या.श्रीदेवी या सौंदर्याची खाण होत्या.

हिंदी चित्रपटसृष्टीची चांदनी म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी रसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. रसिक नेहमीच त्यांच्या आठवणीत रमताना दिसतात.हिंदी चित्रपटसृष्टीत मल्लिका-ए-हुस्न किंवा बॉलीवुडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून संबोधलं जातं. हा तो काळ होता ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत फक्त आणि फक्त अभिनेत्यांचाच बोलबाला होता.

सिनेमातील नायिका म्हणजे केवळ नाचणारी, गाणारी आकर्षक बाहुली किंवा मग नायकाची प्रेमिका एवढंच समजलं जायचं. मात्र याच काळात श्रीदेवी यांनी आपलं श्रेष्ठत्व दाखवून दिले. आपला अभिनय, लोभस सौंदर्य, नृत्य, गंभीर भूमिका तितक्याच खुबीने साकारण्याची कला आणि कॉमेडीचं टायमिंग यामुळे श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळे स्थान निर्माण केले.

कोट्यवधीचे मानधन घेणा-या श्रीदेवी यांचा खर्चसुद्धा तितकाच होता. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करायच्या.श्रीदेवी या सौंदर्याची खाण होत्या. हेच सौंदर्य टिकून रहावं यासाठी त्या खूप काळजी घ्याच्या. महागड्या ब्युटी पार्लरला जाणं, महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरणं, महागडे कपडे, महागड्या साड्या, महागडे बूट असे राजेशाही शौक श्रीदेवी यांना होते. त्यासाठी त्या आपल्या कमाईतील लाखो रुपये खर्च करायच्या.

अतिसुंदर दिसण्याच्या नादात त्यांनी अनेकदा चेहऱ्यावरही अनेकदा सर्जरी केली होती. अतिसर्जरी केल्यामुळे त्यांचा चेहराही खराब झाला होता. त्यांना ओळखणही कठिण झालं होतं. एका कार्यक्रमात श्रीदेवींनी हजेरी लावली होती. नुकतीच सर्जरी केल्यामुळे चेहराही अतिशय वेगळा दिसत होता.

त्यांच्यावर कोणाची नजर पडू नये म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. शेवटी कितीही लपवला तरी चेहरा समोर येणारच. श्रीदेवी यांचे असे रुप पाहून अनेकांना धक्काच बसला होता.आजही त्या कार्यक्रमादरम्यानचे श्रीदेवी यांचे फोटो इंटरनेटवर पाहायला मिळतात.

 

टॅग्स :श्रीदेवी