फेसबुकवर दंगल झाला लीक; बॉक्स आॅफिसवर कमाई मात्र सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 19:48 IST
आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात बॉक्स आॅफिसवर इतिहास रचणाºया या चित्रपटाला पायरेसीचा फटका बसला असून, ...
फेसबुकवर दंगल झाला लीक; बॉक्स आॅफिसवर कमाई मात्र सुरूच
आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात बॉक्स आॅफिसवर इतिहास रचणाºया या चित्रपटाला पायरेसीचा फटका बसला असून, एका पाकिस्तानी व्यक्तीने दंगलचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला आहे. विशेष म्हणजे ‘दंगल’चा हा व्हिडीओ म्हणजे संपूर्ण चित्रपट आहे. या फेसबुक पोस्टला शेअर केले जात आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ या आॅनलाईन न्यूज पोर्र्टलने दिलेल्या वृत्तानुसार हाशमी या नावाच्या व्यक्तिने सर्वात आधी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. हाशमीच्या फेसबुक प्रोफाइलनुसार तो मुळचा पाकिस्तानी असून, तो दुबईमध्ये राहतो. या सिनेमाला शेअर करताना त्याने लिहिले की, ‘दंगल पूर्ण सिनेमा, आमिर खान, फातिमा शेख, सान्या मल्होत्रा. याला नक्की शेअर करा.’ शुक्रवारी रात्री ही चित्रपटाची पायरेटेड कॉपी शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सुमारे साडे चार लाख लोकांनी पाहिला असून त्यापैकी २३ हजार लोकांनी शेअर केला आहे. मात्र भारतात हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर नवे उच्चांक गाठत आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी २०१६ सालात एका दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ३० कोटी तर वर्ल्डवाईड ८ कोटी अशी एका दिवशी ३८ कोटींची कमाई केली आहे. भारतात ‘दंगल’ सिनेमा ४३०० स्क्रीन्सवर तर भारताबाहेर १००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. उत्तर अमेरिका, युएई-जीसीसी, ब्रिटन, आॅस्ट्रेलिया येथे हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित असून, सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक ठरेल असा अंदाज ट्रेन्डसेटर लावत आहेत.