Join us
Daily Top 2Weekly Top 5

​वरुण-आलियाचा ‘तम्मा तम्मा’वर धमाकेदार परफार्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 19:32 IST

बॉलिवूड चॉकलेट बॉय वरुण धवन व बबली गर्ल आलिया भट्ट ही जोडी आगामी ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटात एकत्र ...

बॉलिवूड चॉकलेट बॉय वरुण धवन व बबली गर्ल आलिया भट्ट ही जोडी आगामी ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त व माधुरी दीक्षित यांचे सुपरहीट साँग ‘तम्मा तम्मा’वर आलिया व वरुण डान्स करताना दिसणार आहेत. ‘तम्मा तम्मा’ हे गाणे नव्या रुपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. आलिया भट्ट व वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेला बद्रिनाथ की दुल्हनीया हा चित्रपटाची शूटिंग टप्याटप्याने पार पाडली जात आहे. या चित्रपटात खास ट्विस्ट यावा यासाठी संजय दत्त व माधुरी दीक्षित यांच्या ‘तम्मा तम्मा’ या गाण्याचे खास चित्रीकरण करण्यात येत आहे. एका संकेतस्थळा रॅपर बादशाहने दिलेल्या माहितीनुसार, तम्मा तम्मा हे गाणे चित्रपटात सामील करण्यात आले असून त्याला नव्या रुपात दाखविण्यात येणार आहे. हे गाणे मी रिमिक्स करीत आहे. बादशाह म्हणाला, तम्मा तम्मासारखी गाणी लोकांच्या नेहमीच लक्षात राहतात. यामुळे हे गाणे तोच फिल देणार असावे यासाठी माझा प्रयत्न असेल. हे गाणे पूर्वीसारखीच जादू करेल असे मला वाटते. }}}} या गाण्याच्या मेकिंगबद्दल सांगताना संगीतकार तनिष्क बागची म्हणाले, हे गाणे या चित्रपटात जोडण्याचा विचार वरुण आणि करण जोहरचा होता. हे गाणे या चित्रपटात फिट होत होते. या गाण्याला अनुराधा पौडवाल व बप्पी लहरी यांचा आवाज कायम आहे. त्यांच्यासोबत बादशाहने याला रॅप केले आहे. हे गाणे रिमिक्स म्हणता येणार नाही. हा एक प्रयोग आहे. याचे मूळ कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या गाण्याला वरुण व आलिया यांनी एन्जॉय केले. तुम्ही त्यांचा धमाकेदार परफार्मन्स पाहू शकाल.