Join us

Exclusive : चक्क हत्तीणीने पूजा सावंतला दिली अनोखी भेटवस्तू, समजल्यावर तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

By तेजल गावडे | Updated: April 4, 2019 19:39 IST

अभिनेत्री पूजा सावंतने 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत आहे.

'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री पूजा सावंतने 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत आहे. तिच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. इतकेच नाही तर तिच्या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतूक होत आहे. 

पूजा जंगली चित्रपटात माहूत दाखवली आहे. त्यामुळे तिचे एका हत्तीणीसोबत चित्रपटात बरेच सीन आहेत. या चित्रपटात त्या हत्तीणीचे नाव दीदी असे आहे. या दीदीची आणि पूजाची खूप चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे पूजाने दीदीला खूप मिस करत असल्याचे सांगितले.

 

इतकेच नाही तर दीदी (हत्तीण)ने स्वतःच्या सोंडेने काढलेले चित्र देखील भेट म्हणून दिले आहे. 

याबाबत सांगताना पूजा खूप भावूक झाली होती. ती म्हणाली की, दीदीला मी कधीच विसरू शकत नाही. आमचे चित्रीकरण संपल्यानंतर तिचा निरोप घेतानाचा तो क्षण खूपच वाईट होता. मला आठवतंय की शूट करून एक वर्ष उलटले. पण मला तिची खूप आठवण येते आहे. माझी दीदी सोंडेंने खूप छान चित्र काढू शकते. तिच्या सोंडेत ब्रश दिला तर ती तिला हवे ते चित्र काढते. मी निघताना तिने एक चित्र काढले होते. ते मी मुंबईत घेऊन आले. आता घरात मी त्याची मोठी फ्रेम करून लावली आहे. प्रत्येक दिवशी मी ती पेटिंग पाहते आणि सांगते की तुझ्या पाठीशी किती मोठा आशीर्वाद आहे. एका हत्तीणीचे तुझ्यावर इतके प्रेम आहे.

पुढे पुजा म्हणाली की, चित्रपटाचे शूटिंग संपून एक वर्ष उलटले आहे आणि त्यानंतर मी तिला भेटू शकले नाही. पण प्रमोशन व चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी तिला भेटायला जाणार आहे. मी निघताना जेव्हा मी रडत होते. तेव्हा तिकडचे माहूत मला म्हणाले की दीदीला जेव्हा बाळ होईल आणि जर ती फिमेल असेल तर तिचे नाव आम्ही पूजा ठेवू. 

 

टॅग्स :पूजा सावंत