Join us
Daily Top 2Weekly Top 5

सागरिका घाटगेचा आहे राजघराण्याशी संबंध, खऱ्या आयुष्यात होती नॅशनल हॉकी प्लेअर

By गीतांजली | Updated: January 8, 2021 15:19 IST

सागरिका आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे.

 'चक्क दे इंडिया'मधून घराघरात पोहोचलेली सागरिका घटगे आज  (8 जानेवारीला) तिचा वाढदिवस सेलिब्रेट करते आहे. सागरिका आज तिचा 35वा वाढदिवस साजरा करते आहे. आजही सागरिका 'चक्क दे गर्ल' म्हणूनच ओळखली जाते. 

सागरिकाचा जन्म एका शाही कुटुंबात झाला आहे. सागरिकाची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणा दरम्यान अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 2013 मध्ये आलेल्या रश या 'इमरान हाश्मी'सोबत दिसली होती. 'चक दे इंडिया' सिनेमातून सागरिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. पंजाबी सिनेमा दिलदरिया तिचा खूप हीट ठरला होता. अभिनेत्री शिवाय सागरिका नॅशनल हॉकी प्लेअर आहे. याच कारणामुळे सागरिका 'चक दे इंडिया'त दिसली होती.

सागरिकाने प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले.  सागरिका आणि जहिरची ओळख एका कॉमन फ्रेंडनच्या माध्यमातून झाली होती. सागरिका आणि झहीर लग्न करणार असल्याच्या बातम्या २०१६ पासूनच मीडियात येत होत्या. अखेरीस त्यांनी २४ एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला.

टॅग्स :सागरिका घाटगे