Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tiger 3 : भाईजान नाही तर इम्रान हाश्मीचीच हवा!, 'टायगर ३' च्या सेटवरील Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 10:32 IST

'टायगर ३' च्या सेटवरील लीक झालेल्या या व्हिडिओत इम्रान हाश्मी अॅक्शन सीक्वेन्सची तयारी करताना दिसतोय.

शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan) नंतर आता सलमान खान (Salman Khan) कॅटरिना कैफच्या (Katrina Kaif) 'टायगर ३' ची सगळ्यांना उत्सुकता आहे. 'टायगर' चे पहिले दोन्ही भाग तुफान गाजले त्यामुळे आता 'टायगर ३' कडूनही तशाच अपेक्षा आहेत. शिवाय सिनेमात इम्रान हाश्मीचीही (Emran Hashmi) भूमिका आहे तर शाहरुख खानचा कॅमिओ असणार आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

'टायगर ३' च्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये इम्रान हाश्मीचा फिटनेस पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. सलमान पेक्षा इम्रान हाश्मीच भाव खाऊन जाणार की काय असं चित्र आहे. 'टायगर ३' च्या सेटवरील लीक झालेल्या या व्हिडिओत इम्रान हाश्मी अॅक्शन सीक्वेन्सची तयारी करताना दिसतोय. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

'टायगर ३' ची ही झलक पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे. तसेच यामध्ये इम्रान हाश्मीला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. विशेष म्हणजे सलमान खान आणि इम्रान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. 'इम्रानचा फिटनेस तर बघा', 'सलमान-इम्रान मधील अॅक्शन बघायला मजा येईल' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :इमरान हाश्मीसलमान खानटायगर जिंदा है