Join us

वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मलायका; म्हणाली,‘खड्डयात जा...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:01 IST

न्यूयॉर्कला पोहोचताच मलायकाने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला. असं पहिल्यांदाच झालं की, तिने तिच्या नात्याविषयी खुलेपणाने जाहीर कबुली दिली. वयावरून ट्रोल करणाऱ्यांवर मलायका भडकली. तिने तिच्या रिलेशनशिपवर खूप मोठी पोस्ट लिहून नेटकऱ्यांनाच फटकारले.

          लव्हबर्ड्स मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे सध्या न्यूयॉर्कमध्ये हॉलीडेज एकमेकांसोबत एन्जॉय करत आहेत. मुंबईहून एकत्र रवाना होताना दोघांना पाहण्यात आले होते. न्यूयॉर्कला पोहोचताच मलायकाने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला. असं पहिल्यांदाच झालं की, तिने तिच्या नात्याविषयी खुलेपणाने जाहीर कबुली दिली. वयावरून ट्रोल करणाऱ्यांवर मलायका भडकली. तिने तिच्या रिलेशनशिपवर खूप मोठी पोस्ट लिहून नेटकऱ्यांनाच फटकारले.

           एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली,‘हे खूपच अद्भुत आहे. जेव्हा माझं पहिलं नातं तुटलं तेव्हा मला असं कधीच वाटलं नव्हतं की, मी पुन्हा कधी नात्यात पडेन. माझं हृदय पुन्हा तुटू नये म्हणून मी खूप घाबरत होते. त्यावेळी मला हा भेटला. मग मी पुन्हा नात्यात येण्याचा विचार करू लागले. आता मी खूश आहे. जेव्ह वयातील अंतर तुम्हाला दिसते तेव्हा ते महत्त्वाचे नसून दोन मने जुळणं जास्त महत्त्वाचं असतं. आपण अशा समाजात राहतो जिथे मनापेक्षा वयाला जास्त महत्त्व दिलं जातं. जर जास्त वय असलेला मुलगा लहान मुलीसोबत रोमान्स करत असेल तर तुम्हाला चालतं. मात्र, मुलगीचे वय जास्त आणि मुलगा लहान असेल तर मात्र तुम्हाला ते चालत नाही. जे लोक असा विचार करतात त्यांच्यासाठी मी म्हणेन,‘खड्डयात जा..’

          मलायकापाठोपाठ अर्जुननेही जाहिरपणे प्रेम व्यक्त केल्यानंतर आता कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार, असे तुम्हाला वाटत असेल तर असे नाही. कारण, सध्या माझा लग्नाचा कुठलाही विचार नाही. माझी पर्सनल व प्रोफेशनल लाईफ चांगली सुरु आहे. आयुष्यात मी स्थिरावलो, असे मला वाटतेय. मी माझे खासगी आयुष्य कधीच लपवले नाही. त्यामुळे लग्नाचा बेत असेल तर तेही मी जगापासून लपवणार नाही, असे अर्जुन अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. एकंदर काय तर ‘दोनों तरफ लगी है आग बराबर...’ असेच अर्जुन व मलायकाबद्दल म्हणता येईल.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर