Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय अभिषेक बच्चनच्या माध्यमातून ‘जलसा’त दाखल झाला कोरोना? यामुळे व्यक्त केली जातेय शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 13:41 IST

अमिताभ यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने फिल्म इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे आणि आता हा शिरकाव कसा झाला, याची चर्चा सुरु झालीय.

ठळक मुद्देअमिताभ व अभिषेक यांच्यात कोरोनाची हलकी लक्षणे होती. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमिताभ यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने फिल्म इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे आणि आता हा शिरकाव कसा झाला, याची चर्चा सुरु झालीय. तूर्तास अभिषेक बच्चनच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव झाला, असे मानले जात आहे. कारण अभिषेक हा बच्चन कुटुंबातील एकमेव सदस्य आहे, जो डबिंगसाठी घराबाहेर पडला होता.

बच्चन कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा कोरोना व्हायरसचा वाहक असावा. कारण गेल्या काही दिवसांपासून तो डबिंगसाठी स्टुडिओत जात होता. अमिताभ लॉकडाऊन झाल्यानंतर एकदाही घराबाहेर पडले नाहीत. जया बच्चन व ऐश्वर्या रायही घराबाहेर पडले नाहीत.

अभिषेक अलीकडे ‘ब्रेथ- इंटू द शॅडो’ या वेबसीरिजच्या डबिंगसाठी स्टुडिओत गेला होता. यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याची शंका आहे. दरम्यान अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याने डबिंग केलेला ‘साऊंड अ‍ॅण्ड व्हिजन’ हा स्टुडिओ अस्थायी रूपात बंद करण्यात आला आहे. 

अमिताभ व अभिषेक यांच्यात कोरोनाची हलकी लक्षणे होती. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. अमिताभ यांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तूर्तास 

टॅग्स :अभिषेक बच्चनअमिताभ बच्चन