Join us
Daily Top 2Weekly Top 5

राम गोपाल वर्मा यांचा सुटला तोल; नशेत दिली अभिनेत्यावरच्या प्रेमाची कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 15:08 IST

राम गोपाल वर्मा आणि वादांचे जुने नाते आहे. वादग्रस्त विधाने आणि तेवढीच वादांना हवा देणारे ट्विट यामुळे राम गोपाल वर्मा कायम चर्चेत असतात. ताजे प्रकरण असेच.

ठळक मुद्देनागा चैतन्य व समांथा यांनी २०१७ मध्ये लग्न केले. लग्नानंतरचा नागा व समांथाचा  MAJILI हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट एका क्रिकेटरच्या आयुष्यावर आधारित आहे.

राम गोपाल वर्मा आणि वादांचे जुने नाते आहे. वादग्रस्त विधाने आणि तेवढीच वादांना हवा देणारे ट्विट यामुळे राम गोपाल वर्मा कायम चर्चेत असतात. ताजे प्रकरण असेच. वोडकाचे चार पेग पोटात रिचवल्यावर राम गोपाल वर्मा भान विसरले आणि अशा अवस्थेत एका मोठ्या अभिनेत्यावरच्या प्रेमाची जाहीर कबुली देणारे ट्विट त्यांनी केले. अर्थात हे ट्विट केल्यानंतर लोकांनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले आणि नेहमीप्रमाणे वोडकाची नशा उतरल्यावर राम गोपाल वर्मा यांनी हे ट्विट डिलीट केले.हे ट्विट होते साऊथचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यबद्दलचे. समांथा आणि तिचा पती अभिनेता नागा चैतन्य यांचा ‘MAJILI’ हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. शिवा नारायण दिग्दर्शित हा चित्रपट एका प्रेम कथेवर आधारित आहे. याच चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्याच्या नादात राम गोपाल वर्माच्या भावना अनावर झाल्यात. ‘हो, मी स्वीकार करतो की, मी वोडकाचा चौथा शॉट घेतल्यानंतर ट्विट करतोय. पण वोडका न घेता हे करणे आणखी भयानक असते. मी मनापासून सांगतो की, या ट्रेलरमधील समांथापेक्षाही मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो आणि मी गे नाही,’ असे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले.

वर्मांचे हे वादग्रस्त ट्विट लगेच व्हायरल झाले. त्यावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रिया पाहून कदाचित राम गोपाल वर्मा भानावर आलेत आणि त्यांनी हे ट्विट डिलीट केले. नागा चैतन्य व समांथा यांनी २०१७ मध्ये लग्न केले. लग्नानंतरचा नागा व समांथाचा  MAJILI हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट एका क्रिकेटरच्या आयुष्यावर आधारित आहे.

टॅग्स :राम गोपाल वर्मा