Join us

कोरोनाने घेतला आणखी एक बळी, ‘ड्रिम गर्ल’फेम अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 12:39 IST

Ryinku Singh Nikumbh paased away : 25 मे रोजी रिंकूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यानंतर ती होम आयसोलेशनमध्ये होती.

ठळक मुद्देरिंकूने चिडियाघर व बालवीर सारख्या मालिकेत काम केले होते. हॅलो चार्ली या वेबसीरिजमध्येही ती झळकली होती.

कोरोनाच्या दुस-या लाटेने मनोरंजन विश्वात थैमान घातले. अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली तर अनेक सेलिब्रिटींनी जीवही गमावला. आता ‘ड्रिम गर्ल’ (Dream Girl) या सिनेमात झळकलेली अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ (Ryinku Singh Nikumbh) हिचे कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त आहे. रिंकुची चुलत बहिण चंदा सिंह निकुंभ हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयुष्यमान खुराणाच्या ‘ड्रिम गर्ल’ या सिनेमात रिंकूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृृत्तानुसार, 25 मे रोजी रिंकूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यानंतर ती होम आयसोलेशनमध्ये होती. पण तिचा ताप उतरत नसल्याने तिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. पहिल्या दिवशी तिला सामान्य वार्डात भरती करण्यात आले पण, दुस-याच दिवशी आयसीयूमध्ये शिफ्ट केले गेले होते. रिंकू आधीच दम्याच्या आजाराने ग्रस्त होती. अशात तिची प्रकृती बिघडली व तिने अखेरचा श्वास घेतला.

रिंकूने 7 मे रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लवकरच ती दुसरा डोस घेणार होती.रिंकूच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी काही जण अद्याप पूर्णपणे ठीक झालेले नाहीत.रिंकूने चिडियाघर व बालवीर सारख्या मालिकेत काम केले होते. हॅलो चार्ली या वेबसीरिजमध्येही ती झळकली होती.

टॅग्स :बॉलिवूडआयुषमान खुराणा