Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाला व्हायचे होते डॉक्टर...

By admin | Updated: November 18, 2016 04:45 IST

बॉलिवूडची ‘नटखट बाला’ श्रद्धा कपूर आज बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकेत सामील आहे.

बॉलिवूडची ‘नटखट बाला’ श्रद्धा कपूर आज बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकेत सामील आहे. मात्र अभिनेत्रीऐवजी श्रद्धाने डॉक्टर व्हावे, असे तिची आई शिवांगी यांना वाटत होते. कदाचित, श्रद्धाच्या नशिबी डॉक्टर नव्हे तर अभिनेत्री होणेच लिहिले असावे. शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची मुलगी श्रद्धा हिने स्वत:च्या कष्टाने बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. करिना-प्रियांका-दीपिका यांच्या पिढीतील ती सर्वांत व्हर्सेटाईल अभिनेत्री आहे. पण श्रद्धाच्या आईने तिच्यासाठी वेगळे स्वप्न पाहिले होते. ते म्हणजे, श्रद्धा डॉक्टर होण्याचे. खुद्द शिवांगी यांनीही ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘श्रद्धा सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. ती नेहमी वर्गात पहिली यायची. श्रद्धाचे वडील शक्तीला देखील आपली मुलगी डॉक्टर व्हावी असे वाटत होते, मात्र श्रद्धाला अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करायचे होते. आम्ही तिच्या निर्णयाचा सन्मान केला. आज श्रद्धाच्या निर्णयाचा आम्हाला अभिमान वाटतो. ती अभिनयासोबतच अन्य क्षेत्रातही आपल्या कला गुणांची ओळख करून देत आहे. तिचा नेहमीच नव्या गोष्टी शिकण्यावर भर असतो. श्रद्धा कपूर आपल्या आईला आपली खास मैत्रीण मानते. श्रद्धाला आईकडून गायनाचा वारसा मिळाला आहे. तिने आपल्या काही चित्रपटात स्वत: गाणी गायली आहेत.’