Join us

'फना'मधील आमिर खान आणि काजोलचा मुलगा 'रेहान' आठवतोय का?, आता दिसतो खूप हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:34 IST

'Fanaa' Movie : 'फना' चित्रपटातील आमिर खान आणि काजोलचा मुलगा 'रेहान' तुम्हाला आठवतो का, ज्याने आपल्या निरागसतेने चाहत्यांची मने जिंकली होती. आता हा चिमुरडा २५-२६ वर्षांचा झाला आहे.

'फना' ('Fanaa' Movie) चित्रपटातील आमिर खान (Aamir Khan) आणि काजोल(Kajol)चा मुलगा 'रेहान' तुम्हाला आठवतो का, ज्याने आपल्या निरागसतेने चाहत्यांची मने जिंकली होती. आता हा चिमुरडा २५-२६ वर्षांचा झाला आहे. त्याचे नाव अली हाजी (Ali Haji) आहे. प्रसिद्ध बालकलाकार अली हाजीने सलमान खान, गोविंदा, कतरिना कैफ आणि लारा दत्ताच्या 'पार्टनर' या चित्रपटासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या 'ता रा रम पम' चित्रपटातही दिसला होता. २००० मध्ये अली हा सर्वात जास्त आवडणाऱ्या बाल कलाकारांपैकी एक होता. त्याने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातही काम केले आहे. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभच्या 'फॅमिली' चित्रपटातही तो झळकला होता.

२००६ मध्ये अली हाजीने 'पार्टनर' चित्रपटाचे चित्रीकरण केले आणि त्यात त्याने सिंगल मदर लारा दत्ताच्या ८ वर्षांच्या खोडकर मुलगा 'रोहन'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रेम आणि रोहनचे प्रेम आणि द्वेषाचे नाते दाखवण्यात आले. 'पार्टनर'मध्ये 'रोहन'च्या भूमिकेत अली हाजी त्याची आई लारा दत्ताचा प्रियकर सलमान खान उर्फ ​​'प्रेम' याला कडक टक्कर देताना दिसला. नंतर, दोघेही ९ वर्षांनी 'बिग बॉस १०' च्या सेटवर भेटले आणि त्यांना जुने क्षण आठवले.

अली हाजी आता खूप हॅण्डसम दिसतो आणि छान उंच झाला आहे. आता हाजी अली स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील चालवतो. त्याचे स्क्रीन नेम रोहन, रेहान किंवा रणवीर होते. मात्र त्याचे खरे नाव अली हाजी आहे. अली हाजी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम बाल कलाकारांपैकी एक मानला जात होता. अनेक बॉलिवूड चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्यामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली.

अली हाजीने अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, सनी देओल आणि इतर अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. अली हाजी द्रोण, माय फ्रेंड गणेशा २, पाठशाला, राईट ऑर रॉंग आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसला. तो १०० हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये दिसला आहे. त्याला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर अली हाजी रोहित करण बत्राच्या 'लाइन ऑफ डिस्कंटेंट' आणि विकास बहलच्या 'सुपर ३०'मध्ये दिसला. आज अली हाजी २५ वर्षांचा अभिनेता आहे. याशिवाय तो एक दिग्दर्शक आणि लेखक आहे. असे म्हटले जाते की त्याने क्लीन स्लेट स्टुडिओ नावाचा स्वतःचा थिएटर प्रोडक्शन स्टुडिओ सुरू केला आहे, ज्या अंतर्गत त्याने दोन नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केली आहेत.

टॅग्स :आमिर खान