Join us

​ ‘लवरात्रि’ची हिरोईन वरीना हुसैनचा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:20 IST

सलमान खानने आपल्या मेहुण्यासाठी शोधलेली हिरोईन तुम्ही पाहिली. तिचे नाव गाव सगळेच तुम्ही माहित करून घेतले. आता या हिरोईनचा एक व्हिडिओही तुम्ही पाहायला हवा.

सलमान खानने आपल्या मेहुण्यासाठी शोधलेली हिरोईन तुम्ही पाहिली. तिचे नाव गाव सगळेच तुम्ही माहित करून घेतले. आता या हिरोईनचा एक व्हिडिओही तुम्ही पाहायला हवा. होय, सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा ‘लवरात्रि’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय आणि आयुषला अभिनेत्री मिळाली आहे. वरीना हुसैन तिचे नाव. वरीनाचाही ‘लवरात्रि’ हा पहिला सिनेमा असणार आहे. आता या चित्रपटाची तयारी जोरात सुरू झालीय, तशी वरीनाही चर्चेत आली आहे. वरीनाचा एक हॉट व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत वरीना हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अदांनी चाहत्यांना घायाळ करताना दिसतेय.सलमानने वरीनाला आगळ्या वेगळ्या अंदाजात इंट्रोड्यूस केले आणि यानंतर लगेच वरीना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली. सलमानने वरीनाची ओळख करून देण्यापूर्वी तिचे केवळ १५ हजार फॉलोअर्स होते. पण आता तिच्या फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढते आहे. सध्या वरीना सलमान, अर्पिता खान शर्मा, आयुष शर्मा आणि ‘लवरात्रि’चे दिग्दर्शक अभिराज मीनावाला यांना फॉलो करताना दिसतेय. ALSO READ : ​सलमान खानला आवडलेली ‘मुलगी’ कोण, कुठली? असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी आहे ‘ही’ खास बातमी!वरीनाचे पूर्ण नाव वरीना हुसैन आहे. वरीनाचे वडिल इराकी तर आई अफगाणी आहे. वरीना न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीतून बाहेर पडलेली आहे. यापूर्वी अनेक जाहिरातीत हा सुंदर चेहरा दिसला आहे. २०१३ मध्ये तिने मॉडेलिंग सुरु केले. दिल्लीत राहणारी वरीना अलीकडे मुंबईत शिफ्ट झालीय.   अलीकडे वरीना कॅडबरी सिल्कच्या जाहिरातीत दिसली होती. सलमानने हीच जाहिरात बघून वरीनाला आयुष्यच्या अपोझिट कास्ट करण्याचा निर्णय घेतला.  आयुष व वरीना या दोघांचा ‘लवरात्रि’ हा सिनेमा एक लव्हस्टोरी आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिराज मीनावाला हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवताहेत. आयुषचे तर तुम्हाला ठाऊक आहेच. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा आयुष हा पती. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा होती.