Join us

घरावर गोळीबार झाल्यानंतर दिशा पाटनीच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, "खुशबूचं वक्तव्य..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 10:11 IST

दोन अज्ञात व्यक्तींनी आमच्या घरावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

अभिनेत्री दिशा पाटनीच्या (Disha Patani) बरेली येथील घरावर काल गोळीबार झाला. गोल्डी ब्रार ाणि रोहित गोदारा गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. दिशा पाटनीची बहीण खूशबूने प्रेमानंद महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती ज्याची बरीच चर्चा झाली होती. याच कारणावरुन गुंडांनी तिच्या घरावर गोळीबार केला. या प्रकरणी दिशा आणि खूशबूचे वडील जगदीश सिंह पाटनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत जगदीश पाटनी म्हणाले, "दोन अज्ञात व्यक्तींनी आमच्या घरावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हे विदेशी गन होते. ८-१० राऊंड्स फायर झाले आहेत. खुशबूचं वक्तव्य मोडून तोडून दाखवण्यात आलं. आम्ही सनातनी आहे आणि आम्ही सर्व साधूसंतांचा सम्मान करतो. पण खुशबूचं वक्तव्य मोडून तोडून दाखवण्यात आल्याने आमच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला आहे."

ते पुढे म्हणाले, "पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. योगीजींचा प्रदेश आहे. ते नक्कीच अशा प्रकारच्या गुंडागर्दीवर लगाम लावतील. फायरिंग झाल्यानंतर आम्ही सर्वच दहशतीत होतो. झोपेतून जागे झालो. बाहेर यायचा प्रयत्न केला पण कसंबसं फायरिंगपासून वाचलो. गोल्डी ब्रारने हल्ल्याची जबाबदारी घेतली असली तरी अजून सिद्ध झालेलं नाही. त्याने फक्त सोशल मीडियावरुन सांगितलं आहे आणि मी याला गांभीर्याने घेत नाही. कारण संविधानात आपलं म्हणण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारचा हल्ला झाल्यानंतर सध्या याबद्दल काहीच स्पष्ट सांगता येत नाही."

"पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवली आहे. बाहेर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मागेही पोलिस आहेत. तपासात पोलिस कोणतीही कसर सोडणार नाहीत. जेव्हापासून घटना घडली आहे पोलिस अॅक्शन मोडवर आहेत", असंही ते म्हणाले.

टॅग्स :दिशा पाटनीगोळीबारसुंदर गृहनियोजनउत्तर प्रदेश