Join us

Hotnessच्या चक्करमध्ये दिशा पटानीने पार केल्या सर्व मर्यादा, शेअर केला सर्वात बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha patani) तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha patani) तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.  ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांचं लक्ष वेधतं असते. तिच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला अनेक बोल्ड आणि हॉट फोटो पाहायला मिळतील. पण, आता तिने शेअर केलेल्या नव्या फोटोने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा मोडल्या आहेत. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.  आपल्या फॅन्ससाठी एक खास फोटो शेअर केला.

या फोटोमध्ये दिशा पटानीने बिकिनी परिधान करून समुद्रकिनाऱ्यावर पोज देताना दिसतेय.  फोटो इतका बोल्ड आहे की दिशा पटनीचे चाहते त्यावर  कमेंट करत आहेत. फोटोमध्ये दिशा समुद्रकिनारी उभी आहे. दिशा पटनी समुद्रकिनाऱ्यावर उभी राहून कॅमेराकडे पाहत आहे. जरी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. या फोटोसाठी तिने लाल रंगाच्या बिकिनीमध्ये पोज दिली. 

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने अनेकदा बिकिनी आणि स्विमिंग पूलमधील हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या नवीन फोटोमध्ये तिचे केस खुले असून ती खूपच हॉट दिसत आहे.दिशा पटानीच्या या फोटोला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. चाहते त्यावर हार्ट इमोजी बनवून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झआले तर लवकरच ती 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय ती  अभिनेता जॉन अब्राहम, अर्जुन कपूर यांच्यासोबत मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :दिशा पाटनी