Join us  

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ मालदिवमध्ये एन्जॉय करतायेत व्हॅकेशन, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 11:06 AM

अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ मालदिवमध्ये एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. मात्र आता ती बोल्ड फोटो आणि टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असल्यामुळे चर्चेत आली आहे. दिशा आणि टायगरला मालदीवमध्ये एकत्र पाहून अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दिशा पटानीने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लाल रंगाची बिकिनी घालून ती समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे. दिशाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

दिशा पटानीचा हा बोल्ड फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर टागर श्रॉफच्या आईने आणि बहिणीनेही कॉमेंट केली आहे. आएशा श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफने या फोटोंवर कॉमेंट्स केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 

दिशा पटानीसोबतही टायगर काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो आपली बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्याच्या हॉट शर्टलेस फोटोंनी तरूणींना चांगलीच भुरळ पाडली आहे.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सलमान खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट राधेमध्ये झळकणार आहे. राधे या सिनेमात सलमान व दिशा रोमान्स करताना दिसणार आहे.

लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटींग खोळंबले होते. पण तब्बल साडेसहा महिन्यांनी शूटींग पुन्हा सुरु झाली आहे. तर टायगर श्रॉफ बागी ४ आणि हिरोपंती २ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात करणार आहे. 

टॅग्स :टायगर श्रॉफदिशा पाटनीसलमान खान