दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचे उदाहरण देताना हरीशने म्हटले की, चित्रपट निर्मात्यांवर अगदी सहजपणे निशाणा साधला जात आहे. पुढच्या काळात तर असे प्रकार आणखीनच वाढणार आहेत. खरं तर चित्रपट निर्मातेच समाजात होत असलेल्या सांप्रदायिक दंगली दाखविण्याची हिम्मत ठेवतात. ही एक कला असून, याकडे त्यादृष्टीनेच पहायला हवे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट बघून जर त्यांना त्यात काही चुकीचे वाटले तर त्यांनी त्यावर बॅन आणायला हवे. हे कोण लोक आहेत, जे चित्रपट रिलीज होऊ देत नाहीत? असेच चालू राहिले तर मग सेन्सॉर बोर्ड हवेच कशाला? असा प्रश्नही हरीशने उपस्थित केला.
मुजफ्फरनगर येथे हा चित्रपट रिलीज करण्यावरून बºयाचशा अडचणी येत आहेत. हरीशने म्हटले की, काही लोक चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडथळे निर्माण करू पाहत आहेत. कारण जर हा चित्रपट या भागात रिलीज झाला तर बºयाचशा गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे. विशेष म्हणजे थिएटर मालकही लोकांच्या विरोधामुळे सावध भूमिका घेत आहेत. वास्तविक कोणीही जाहीरपणे याबाबतची वाच्यता केली नाही, परंतु मला असे कळाले की, थिएटर मालकांना हा चित्रपट रिलीज न करू देण्यावरून धमक्या देण्यात आल्या आहेत.