अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी ऐतराज, मुझसे शादी करोगी, अंदाज, वक्त अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकेकाळी दोघांच्या अफेअरच्या अफवा पसरू लागल्या होत्या. त्यावेळी अक्षय कुमार विवाहित होता. आता चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी अक्षय आणि प्रियांकाच्या अफेअरवर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड बबलशी बोलताना सुनील दर्शन म्हणाले की, त्यांनी बरसात चित्रपटावर काम सुरू केले होते. त्यांनी अक्षय आणि प्रियांकासोबत चित्रपटाचे एक गाणे शूट केले होते. पण त्यानंतर गोष्टी चुकीच्या झाल्या. सुनील दर्शन म्हणाले, 'काही काळानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशांतता निर्माण झाली. त्यांनी मला सांगितले की काही वैयक्तिक समस्या आहेत आणि त्यापैकी एका कलाकारासोबत चित्रपट बनवता येईल का. मला वाटते की सर्व कलाकार जबाबदार असले पाहिजेत आणि विवाहित पुरुषांनी आणखी जबाबदार असले पाहिजे. पण चुका करणे हा पुरुषांचा स्वभाव आहे आणि निर्मात्यांना त्यांच्या चुकांचा फटका सहन करावा लागतो. मी त्या घटनेसाठी प्रियांकाला जबाबदार ठरवलं नाही.
''यासाठी मी प्रियांकाला दोष देत नाही''यापूर्वी, सुनीलने फ्रायडे टॉकीजशी बोलताना म्हटले होते की, ''काही चुका झाल्या होत्या. प्रियांका आणि अक्षय यांच्याबद्दल अफवा पसरू लागल्या होत्या आणि ट्विंकलने तिचे घर सोडले होते. एक अभिनेता म्हणून, तुम्ही जबाबदार असले पाहिजे. जर तुमची पत्नी अभिनेत्री असेल आणि तिला इंडस्ट्रीबद्दल सर्व काही माहित असेल आणि तिने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्ससोबत काम केले असेल. तर तिला सर्व काही माहित असेल. मी यासाठी प्रियांका चोप्राला दोष देत नाही. ती फक्त तिच्या हिताचे काम करत होती.''