कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्याचा फटका अनेकांना बसला. त्यात देशातील इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. दरम्यान अभिनेत्री रिचा चड्ढाने नुकतेच शेअर केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
अभिनेत्री रिचा चड्ढाने नुकतेच तिच्या पेट्रोल गाडीची टाकी फूल केली आणि तिला ७८५५ रुपये भरावे लागले. बिलाचा फोटो शेअर करत तिने ट्विट केले की, ‘मी गाडीत नुकतेच पेट्रोल भरले. गाडीची टाकी फूल करण्यासाठी मला ७८५५ रुपये मोजावे लागले.’ तिच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.