Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिया मिर्झा व कनिका ढिल्लनच्या घटस्फोटामागे आहे का काही कनेक्शन?, दियाने केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 11:36 IST

अभिनेत्री दीया मिर्झाने लग्नाच्या पाच वर्षानंतर नवरा साहिल सांगासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर काही तासानंतर लेखिका कनिका ढिल्लनने नवरा प्रकाश कोवेलामुडीसोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं.

बॉलिवूडमधील दोन सेलेब्सनं नुकतंच त्यांच्या खासगी जीवनातील एक शॉकिंग निर्णय घेतला आहे. पहिले अभिनेत्री दीया मिर्झाने लग्नाच्या पाच वर्षानंतर नवरा साहिल सांगासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर काही तासानंतर लेखिका कनिका ढिल्लनने नवरा प्रकाश कोवेलामुडीसोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. एकाच दिवसात दोन लग्न तुटत असल्याच्या वृत्तानं चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र दीया मिर्झा व कनिका ढिल्लन यांच्या विभक्त होण्यामागे काही कनेक्शन असेल का, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार देखील या घटस्फोटामागे कनेक्शन असल्याचं सांगितलं जातंय. अशी चर्चा आहे की दीया मिर्झाचं लग्न तुटण्यामागे कनिका ढिल्लन कारणीभूत असल्याचं बोललं जातं. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, कनिका ढिल्लनचं दीया मिर्झाचा नवरा साहिल सांगासोबत अफेयर आहे. ज्यामुळे दीया नवऱ्यापासून वेगळे झाले.

स्पॉटबॉयनं आपल्या रिपोर्टमध्ये वेबसाईट बॉलिवूड बबलने दिलेल्या माहितीनुसार, दीया मिर्झाला कनिका व साहिल सांगा यांच्या अफेयरबद्दल समजलं होतं. त्यानंतर तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दियाने या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचं सांगितलं. तिने ट्विट करत सांगितलं की, मीडियामध्ये साहिलबद्दल जे काही वृत्त सुरू आहेत, हा बेजबाबदारपणा आहे. या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही. आम्ही दोघे विभक्त होण्यामागे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही. आम्ही मीडियाला विनंती केली होती की आम्हाला प्रायव्हसी द्या. मी आशा करते की ते आमच्या विनंतीचा आदर करतील.

दिया आणि साहिल दोघे ही फिल्म इंडस्ट्रीतून आहेत. दोघांची पहिली ओळख 2009 मध्ये झाली होती ज्यावेळी एका सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन साहिल दियाच्या घरी गेला होता. त्या छोट्याशा भेटीत साहिलला पाहून दियाच्या मनाची तार छेडली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ब्रुकलेन ब्रिजवर साहिलने दियाला प्रपोज केले होते.  दियाचे 2014 मध्ये साहिल संघासोबत लग्न केले होते. अनेक वर्ष नात्यामध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले होते.  दिया आणि साहिलने परस्पर सहमतीने हा निर्णय घेतल्याचे तिने ट्विटरवर सांगितले आहे.

कनिका ढिल्लनने  ‘जजमेंटल है क्या’चे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी यांच्यासोबत लग्न केले होते. पण आता हे कपल विभक्त झाले आहे. खुद्द प्रकाश यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.प्रकाश व कनिका यांनी हा निर्णय अचानक घेतला नाही. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण याचदरम्यान  ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचे काम सुरु झाले. कनिकाच्या मते, कधी काय झाले, याला काहीही अर्थ नाही. आम्ही विभक्त झालो असलो तरी आजही चांगले मित्र आहोत.

टॅग्स :दीया मिर्झा