बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग अभिनित 'धुरंधर' हा स्पाय थ्रिलर चित्रपट सध्या जागतिक स्तरावर गाजतोय. या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले आहेत. तसेच ओटीटीवरही या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळते आहे. विशेष म्हणजे, ज्या देशांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती, तिथेच आता या चित्रपटाने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. ३० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'धुरंधर' सध्या पाकिस्तानमध्ये नंबर १ वर ट्रेंड करत असल्याची समोर आली आहे.
आखाती देश आणि पाकिस्तानमध्ये 'धुरंधर' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नव्हता. मात्र, नेटफ्लिक्सवर येताच पाकिस्तानी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी उत्सुकता दाखवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, 'धुरंधर'ने पाकिस्तानमध्ये 'तेरे इश्क में' आणि 'हक' सारख्या इतर बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.
पाकिस्तानमध्ये टॉप ५ ट्रेंडिंग चित्रपट१. धुरंधर २. तेरे इश्क में ३. हक४. द बिग फेक५. दे दे प्यार दे २
ओटीटी रिलीजमध्ये केले 'हे' बदलनेटफ्लिक्सवर प्रदर्शित केलेल्या 'धुरंधर'मध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. संजय दत्तने साकारलेल्या 'एसपी अस्लम' या पात्राचे काही बलुची संवाद काढून टाकण्यात आले आहेत. या संवादांवर एका समुदायाने तीव्र आक्षेप नोंदवला होता आणि कायदेशीर तक्रारही केली होती. हा भाग थिएटर प्रिंटमधूनही हटवण्यात आला होता, तोच बदल ओटीटीवर कायम ठेवण्यात आला आहे. बाकी चित्रपटात कोणताही मोठा कट करण्यात आलेला नाही. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि राकेश बेदी यांसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. येत्या १९ मार्चला प्रदर्शित होणारा 'धुरंधर २'साठीदेखील चाहते उत्सुक आहेत.
Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' is globally popular, breaking box office records. Despite a ban in Pakistan, it's Netflix's number one film there. Some dialogue was removed for OTT release. The sequel is expected on March 19.
Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर' वैश्विक स्तर पर लोकप्रिय है, बॉक्स ऑफिस के रिकॉर्ड तोड़ रही है। पाकिस्तान में प्रतिबंध के बावजूद, यह वहां नेटफ्लिक्स पर नंबर एक फिल्म है। ओटीटी रिलीज के लिए कुछ संवाद हटा दिए गए। सीक्वल 19 मार्च को अपेक्षित है।