Dhurandhar The Revenge Ott Release : 'धुरंधरः द रिव्हेंज' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमा जगभरातील अनेक रेकॉर्ड मोडले. आता 'धुरंधरः द रिव्हेंज' ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता लवकरच चाहत्यांना घरबसल्या हा सिनेमा पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा निर्मात्यांनी एक मोठे सरप्राईज ठेवले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 'धुरंधरः द रिव्हेंज'ची ओटीटी आवृत्ती थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापेक्षा वेगळी असेल.थिएटरमध्ये हा चित्रपट ३ तास ४९ मिनिटांचा होता, मात्र नेटफ्लिक्सवर तो ३ तास ५२ मिनिटांचा असेल. म्हणजेच प्रेक्षकांना काही नवीन आणि न पाहिलेली दृश्ये (Deleted Scenes) पाहायला मिळतील. स्ट्रीमिंग कार्डवर चित्रपटाच्या नावापुढे 'रॉ अँड अनदेखी' (Raw and Unseen) असे लिहिले आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कधी आणि कुठे होणार प्रदर्शित?
मिळालेल्या माहितीनुसार, 'धुरंधरः द रिव्हेंज' येत्या १४ मे २०२६ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) वर स्ट्रीम केला जाईल. तर परदेशातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर उपलब्ध असेल. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबतच संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'धुरंधर'चा पहिला भाग २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत दुसरा भाग प्रदर्शित करून निर्मात्यांनी सर्वांना चकित केले होते.
Web Summary : 'Dhurandhar: The Revenge,' a box office hit, is coming to OTT with extra scenes. The Netflix version will be longer, offering unseen footage. Premiering May 14, 2026, on Jio Hotstar and Netflix, it stars Ranveer Singh.
Web Summary : बॉक्स ऑफिस पर हिट फिल्म 'धुरंधर: द रिवेंज' ओटीटी पर अतिरिक्त दृश्यों के साथ आ रही है। नेटफ्लिक्स संस्करण लंबा होगा, जिसमें अनदेखे फुटेज होंगे। 14 मई, 2026 को जियो हॉटस्टार और नेटफ्लिक्स पर प्रीमियर, रणवीर सिंह अभिनीत।