Join us

'धुरंधर' सिनेमा 'या' सत्य घटनेवर आधारीत? आर.माधवन साकारतोय अजित डोवाल यांची भूमिका

By देवेंद्र जाधव | Updated: July 7, 2025 13:42 IST

'धुरंधर' सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे, असं बोललं जातंय. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जाणून घ्या

रणवीर सिंगच्या आगामी 'धुरंधर' सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक काल रिलीज झाला. रणवीर सिंगचा जबरदस्त अभिनय आणि त्यासोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल या कलाकारांच्या अभिनयाची झलक 'धुरंधर' सिनेमात बघायला मिळाली. सिनेमात एका विशेष गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे आर.माधवन. अभिनेता माधवन या सिनेमात अजित डोवाल यांची भूमिका साकारतोय, अशी चर्चा आहे. याशिवाय 'धुरंधर' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे, असंही बोललं जातंय. जाणून घ्या.

'धुरंधर' सिनेमा या सत्य घटनेवर आधारीत

'धुरंधर'च्या टीझरमध्ये आर. माधवनचा लूक संपूर्णपणे अजित डोवाल यांच्याशी साधर्म्य साधणारा आहे, असं दिसतंय. अजिल डोवाल यांनी  IPS म्हणून करिअरची सुरुवात केली. १९८८ साली ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी मोठी कामगिरी पार पाडली. याशिवाय २०१४ साली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली. इंडिया फोरम्सला दिलेल्या रिपोर्टनुसार, आदित्य धरचा 'धुरंधर' हा सिनेमा मेजर मोहित शर्मा यांच्या कामगिरीवर आधारीत आहे.

मेजर मोहित शर्मा यांना इफ्तिखार भट या दुसऱ्या नावाने ओळखलं गेलं. २००५ मध्ये मेजर मोहित शर्मा यांनी इफ्तिखार या नावाने सीक्रेट ऑपरेशन्स केली. या ऑपरेशनच्या अंतर्गत त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या दहशतवाद्यांशी मैत्री केली. त्यानंतर मोहित यांनी त्या आतंकवाद्यांना यमसदनी धाडलं. त्यामुळे रणवीर सिंग 'धुरंधर' सिनेमात मेजर मोहित शर्मा उर्फ इफ्तिखार यांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. याविषयी अधिकृत खुलासा झाला नसला तरी जेव्हा 'धुरंधर'चा ट्रेलर येईल, तेव्हा या गोष्टी स्पष्ट होतील, असं बोललं जातंय.

टॅग्स :रणवीर सिंगअक्षय खन्नाअजित डोवालबॉलिवूडअर्जुन रामपाल