आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली बालकलाकार सारा अर्जुन हिने शनिवारी पहाटे उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. सारासोबत तिचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते राज अर्जुन तसेच तिची आई सान्यादेखील उपस्थित होत्या. संपूर्ण अर्जुन कुटुंब महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेच मंदिरात दाखल झाले होते.
पहाटे ४ च्या सुमारास सारा कुटुंबासह महाकालेश्वराच्या दर्शनाला पोहोचली आणि 'भस्म आरती' मध्ये सहभाग घेतला. सुमारे दोन तास ती मंदिरात होती. यावेळी तिने मनोभावे पूजा केली आणि 'जय महाकाल'चा जयघोष करत शिवभक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. तिच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
भस्म आरतीनंतर साराने नंदीच्या कानात आपली इच्छा व्यक्त केली आणि गर्भगृहाच्या उंबरठ्यावरून भगवान महाकालेश्वराला जलाभिषेक केला. परंपरेनुसार सर्व विधी पूर्ण केल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सारा आणि तिच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. यावेळी साराने महाकाल मंदिर परिसरातील शिस्त आणि व्यवस्थेचेही कौतुक केले.
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सारा म्हणाली की, "महाकालेश्वराचे दर्शन घेऊन मला खूप शांती आणि आनंद मिळाला आहे. मी देवाकडे स्वतःसाठी काहीही मागितले नाही, पण सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, अशी प्रार्थना केली आहे." सारा अर्जुनने 'धुरंधर' व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांत काम केले आहे. बालकलाकार म्हणून तिने याआधीच मोठी लोकप्रियता मिळवली होती.
Web Summary : Sara Arjun, famed for 'Dhurandhar', visited Ujjain's Mahakaleshwar temple with her parents. She attended the Bhasma Aarti, offered prayers, and expressed devotion. The family was honored by the temple. Sara expressed peace and prayed for everyone's well-being.
Web Summary : 'धुरंधर' फेम सारा अर्जुन ने अपने माता-पिता के साथ उज्जैन के महाकालेश्वर मंदिर का दौरा किया। उन्होंने भस्म आरती में भाग लिया, प्रार्थना की और भक्ति व्यक्त की। मंदिर द्वारा परिवार को सम्मानित किया गया। सारा ने शांति व्यक्त की और सभी के कल्याण के लिए प्रार्थना की।