Sara Arjun Connection With Sachin Tendulkar : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट रोज नवनवीन रेकॉर्ड करत आहे. मात्र, सध्या या चित्रपटामधील अभिनेत्री सारा अर्जुन ही एका वेगळ्याच आणि मजेशीर कारणाने चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सारा अर्जुन आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यातील एका अनोख्या 'कनेक्शन'ची जोरदार चर्चा रंगली आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की सारा आणि सचिन तेंडुलकर यांच्यात नेमका काय संबंध आहे? तर हा संबंध नात्याचा नाही, तर 'नावाचा' आहे. एका सोशल मीडिया युजरने साराच्या फोटोवर केलेली एक मजेशीर कमेंट व्हायरल झाली आहे. जेव्हा साराने 'धुरंधर'मधील आपला फोटो शेअर केला, तेव्हा एका चाहत्याने कमेंट केली की, "ही "सचिन तेंडुलकरच्या दोन्ही मुलांची नावे ही एकटीच घेऊन बसली आहे". खरोखरच, अभिनेत्रीचे पूर्ण नाव 'सारा अर्जुन' असे आहे आणि योगायोगाने सचिन तेंडुलकरच्या मुलीचे नाव 'सारा' असून मुलाचे नाव 'अर्जुन' आहे.
सारा अर्जुन नक्की कोणाची मुलगी?सारा अर्जुन ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सारा अर्जुननेही बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. लहानपणी जाहिरातींमधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. वयाच्या पाचव्या वयापर्यंत ती १०० हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली. तिनं अनेक मोठ्या ब्रँडसोबत काम केलं आहे. सारानं 'देईवा थिरुमगल', 'एक थी डायन', '४०४', 'जज्बा', 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' आणि 'पोन्नियिन सेल्वन: आय अँड II' या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ती सध्या फक्त २० वर्षांची आहे. तिने अभिनयासोबत आपले शिक्षणही सुरू ठेवलं आहे.
Web Summary : Sara Arjun, star of 'Dhurandhar,' is linked to Sachin Tendulkar by name. A user noted her name mirrors Sachin's children's names: Sara and Arjun. Raj Arjun's daughter, Sara began acting as a child, appearing in over 100 ads and films like 'Ponniyin Selvan'.
Web Summary : 'धुरंधर' की अभिनेत्री सारा अर्जुन का सचिन तेंदुलकर से नाम का संबंध है। एक यूजर ने बताया कि उनका नाम सचिन के बच्चों के नाम: सारा और अर्जुन को दर्शाता है। राज अर्जुन की बेटी सारा ने एक बच्चे के रूप में अभिनय शुरू किया, 100 से अधिक विज्ञापनों और 'पोन्नियिन सेल्वन' जैसी फिल्मों में दिखाई दीं।