रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत आहे. ५०० कोटींचा टप्पा पार केलेल्या या चित्रपटात अनेक कलाकारांच्या भूमिकांची चर्चा होत आहे, पण प्रेक्षकांसाठी सर्वात मोठे सरप्राईज ठरले ते म्हणजे अभिनेत्री यामी गौतमची भूमिका. यामी गौतमच्या 'हक' चित्रपटाचे दिग्दर्शक सुपर्ण एस. वर्मा यांनी यामीच्या या छोट्या भूमिकेमागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे.
दिग्दर्शक सुपर्ण म्हणाले की, आदित्य धरने त्यांच्या ‘हक’ (Haq) या चित्रपटाचा कट पाहिला होता. तो पाहिल्यानंतर आदित्यने त्यांना सांगितले की, त्यांनी ‘धुरंधर २’ मध्ये एक सरप्राईज शूट केले आहे.
सुपर्ण यांनी पुढे सांगितले, ‘मी त्यांना विचारले की ते काय आहे, तर ते म्हणाले की ते ‘धुरंधर’च्या शेवटच्या सीनमध्ये एक सरप्राईज आहे. मी पुन्हा विचारले, ‘काय आहे?’, तेव्हा ते म्हणाले, ‘यामीची छोटी भूमिका.’ जेव्हा मी पुन्हा विचारले, तेव्हा त्यांनी फक्त इतकेच सांगितले, ‘अंदाज लाव, ती एक नेमप्लेट आहे.’ मी खूप गोंधळून गेलो आणि विचित्र अंदाज लावू लागलो. आम्ही दोघेही यावर खूप हसत होतो, ज्यानंतर शेवटी त्यांनी सांगितले की, ‘तिचे नाव शाझिया बानो आहे.’
दिग्दर्शक पुढे म्हणाले, ‘तेव्हाच मला जाणवले की आमच्यामध्ये एकमेकांच्या कामाबद्दल खरोखरच आदर आहे आणि आम्हाला एकमेकांचे काम मनापासून आवडते. आणि हो, आदित्यने दिलेलं हे सरप्राईज खूप गोड आणि कौतुकास्पद होते.'' तर योगायोग म्हणजे, यामीने 'धुरंधर २' मध्ये साकारलेली भूमिका आणि 'हक'मध्ये साकारलेली भूमिका या दोन्ही पात्रांचं नाव एकच होतं.
यामी गौतम 'धुरंधर २'मध्ये दिसताच प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून तिचे स्वागत केले. सोशल मीडियावरही तिच्या या 'सरप्राईज' एन्ट्रीची खूप प्रशंसा होत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या भूमिकेतही यामीने आपल्या अभिनयाची छाप पाडली असून, ती या मिशनमधील एक 'मास्टरमाइंड' असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
Web Summary : Director reveals Yami Gautam's brief 'Dhurandhar 2' role was a surprise gift from director Aditya Dhar, connecting to her film 'Haq'. She played Shazia Bano, a mastermind, mirroring her 'Haq' character. Her appearance sparked audience excitement.
Web Summary : निर्देशक ने बताया कि 'धुरंधर 2' में यामी गौतम की छोटी भूमिका निर्देशक आदित्य धर का एक सरप्राइज गिफ्ट थी, जो उनकी फिल्म 'हक' से जुड़ी थी। उन्होंने शाजिया बानो की भूमिका निभाई, जो एक मास्टरमाइंड है, जो उनके 'हक' चरित्र को दर्शाती है। उनकी उपस्थिति ने दर्शकों में उत्साह भर दिया।