Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मोदींची अंधभक्त असल्याचा अभिमान आहे...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली- "जर तुम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:39 IST

तेलुगु अभिनेत्री आणि पवन कल्याणची एक्स पत्नी रेणु देसाई हिनेदेखील 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मोदींची अंधभक्त असल्याचा अभिमान आहे, असं म्हटलं आहे.

'धुरंधर २' ने बॉलिवूडचं चित्रच बदलून टाकलं आहे. प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर आदित्य धरच्या 'धुरंधर २'ने धमाका केला आहे. जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर २'ची चर्चा होताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटीही आदित्य धरच्या या सिनेमाचं कौतुक करत आहेत. तेलुगु अभिनेत्री आणि पवन कल्याणची एक्स पत्नी रेणु देसाई हिनेदेखील 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मोदींची अंधभक्त असल्याचा अभिमान आहे, असं म्हटलं आहे. 

रेणू देसाईने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये तिने सिनेमागृहातील फोटो शेअर केला आहे. ती म्हणते, "जर तुम्हाला आपल्या देशाचे सैनिक आणि गुप्तचर यंत्रणांचा आदर असेल ज्यांच्यामुळे आपण रात्री शांतपणे आपल्या घरात झोपतो आणि तरीही आपल्या देशाबद्दल तुम्ही बरळत असाल तर धुरंधर १ आणि २ बघा". 

दुसऱ्या स्टोरीमध्येही रेणू देसाईने 'धुरंधर २'मधील दाऊदची एक रील शेअर केली आहे. यामध्ये त्याचा डायलॉग आहे. "जब से ये चायवाला हिंदुस्तान में आया है, हमारे लोगो के अंदर खौफ और बड गया आहे", असं दाऊद म्हणत आहे. ही रील रेणू देसाईने शेअर केली आहे. "भाजपा आणि पंतप्रधान मोदींची अंधभक्त असल्याचा गर्व आहे", असंही तिने म्हटलं आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

दरम्यान, 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'धुरंधर २'ची दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवरील कमाई वाढत चालली आहे.'धुरंधर: द रिव्हेंज' पेड प्रीव्ह्यूजसह पहिल्यादिवशी १४५  कोटींची दमदार ओपनिंग केली होती. या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५१९.१२ कोटींचा गल्ला जमवला आहे. आदित्य धरच्या या चित्रपटाने परदेशात २३६.०० कोटींचा टप्पा गाठला असून, यामुळे चित्रपटाची जगभरातील पाच दिवसांची एकूण कमाई अंदाजे ८५६.०० कोटींवर पोहोचली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Proud to be Modi Devotee After Watching 'Dhurandhar 2'

Web Summary : Telugu actress Renu Desai praises 'Dhurandhar 2', expressing pride in being a Modi devotee. She urges those disrespecting India to watch it. The film stars Ranveer Singh and has grossed ₹856 crore worldwide.
टॅग्स :धुरंधर सिनेमासेलिब्रिटी