Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांनी प्रपोगंडा नावाचा कबुतर पकडला आहे...", 'धुरंधर २'ला ट्रोल करणाऱ्यांना रवी किशन यांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:39 IST

आदित्य धरचं दिग्दर्शन असलेल्या आणि रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणण्याबाबत अभिनेता रवी किशनने मत मांडलं आहे. 

Dhurandhar 2: 'धुरंधर २' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे. अशातच सिनेमाला प्रपोगंडा म्हणत त्याला ट्रोलही केलं जात आहे. आदित्य धरचं दिग्दर्शन असलेल्या आणि रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणण्याबाबत अभिनेता रवी किशन यांनी मत मांडलं आहे. 

ते म्हणाले, "सिनेमाला प्रपोगंडा बोलणं खूप चुकीचं आहे. साऊथचे कलाकार त्यांच्या सिनेमाला सपोर्ट करतात. प्रत्येकाने हे केलं पाहिजे. सिनेमा प्रपोगंडा आहे असं म्हणण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. लोकांनी नवीन कबुतर पकडला आहे. लेखकाने काही सत्य घटना उचलल्या आणि टीमने अतिशय सिनेमॅटिक पद्धतीने ते मोठ्या पडद्यावर उतरवलं. प्रेक्षक सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत, याचा आनंद साजरा केला पाहिजे. इंडस्ट्रीची अवस्था खूप वाईट होती. भोजपुरी इंडस्ट्री तर शटडाऊन होण्याच्या मार्गावर आहे. हा सिनेमा म्हणजे इंडस्ट्रीसाठी आशीर्वादच आहे. समाजात काय घडतंय हे दाखवण्याचा सिनेमातून प्रयत्न केला जात आहे. आपल्याला इतिहासही रिसर्चद्वारे योग्य प्रकारे समजून घेण्याची गरज आहे. जी पानं इतिहासातून पुसली गेली आहेत ते सत्य सगळ्यांसमोर आणण्याची गरज आहे. 

सिनेमाचा भाग नसल्याची खंत वाटते का? असं विचारल्यावर रवी किशन यांनी उत्तर दिलं की "कोणीतरी माझ्यासाठीही धुरंधरसारखं काहीतरी लिहित असेल, याची मला खात्री आहे. माझ्या नशिबात जे असेल ते माझ्याकडे नक्कीच येईल. जसं गँग्स ऑफ वासेपूर या माझ्या अत्यंत आवडत्या सिनेमात काम करणं माझ्या नशिबात नव्हतं. तसंच या सिनेमाचंही असेल. पण मला कोणतीच खंत नाही. एक दिवस मी नक्कीच आदित्य धर आणि संजय लीला भन्साळींसोबत काम करेन. जसं की आता मी करण जोहरच्या नागझिलामध्ये काम करत आहे. त्यामुळे मला कोणतीच खंत नाही". 

English
हिंदी सारांश
Web Title : Ravi Kishan slams trolls calling 'Dhurandhar 2' propaganda.

Web Summary : Ravi Kishan defends 'Dhurandhar 2,' criticizing the 'propaganda' label. He highlights industry support and cinematic storytelling, dismissing regrets about not being in the film.
टॅग्स :धुरंधर सिनेमारवी किशन