Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात जलद १००० कोटींचा गल्ला जमवणारा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:32 IST

Dhurandhar 2: नंबर वन स्टार ऑफ इंडिया! रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जलद १००० कोटींचा चित्रपट

रणवीर सिंगने बॉक्स ऑफिसवरील वर्चस्वाची व्याख्या पुन्हा एकदा बदलली आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्विवाद पॉवरहाऊस म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासह त्याने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात जलद १००० कोटींचा चित्रपट दिला असून, या पिढीतील सर्वोत्कृष्ट स्टार म्हणून त्यांची ओळख अधिकच ठळक झाली आहे. या चित्रपटाने दमदार कामगिरी करत भारतातील एकूण ग्रॉस कमाई १०४४ कोटींपर्यंत पोहोचवली आहे, तर नेट कलेक्शन ८७२ कोटी इतके झाले आहे. या भव्य आकडेवारीतून चित्रपटाची प्रचंड लोकप्रियता दिसून येतेच. पण त्याचबरोबर रणवीर सिंगचा बॉक्स ऑफिसवरील अफाट प्रभावही स्पष्ट होतो.

अवघ्या काही महिन्यांत रणवीर सिंगने सलग दोन १००० कोटींचे ब्लॉकबस्टर दिले. पहिला ‘धुरंधर’ आणि आता ‘धुरंधर २’. ही कामगिरी त्याला इतरांपेक्षा वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवते आणि नवीन विक्रमांची उंची निर्माण करते. आता स्पर्धा इतरांशी राहिलेली नाही. ती झाली आहे रणवीर सिंग विरुद्ध रणवीर सिंग. प्रत्येक चित्रपटासोबत तो केवळ विक्रम मोडत नाही, तर स्वतःचेच रेकॉर्ड पार करत स्टारडमची नवी व्याख्या लिहित आहे.

केवळ आकडेवारीच नाही, तर या फ्रँचायझीमधील त्याच्या अभिनयाचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. विविध स्तर आणि छटा असलेली पात्रे सहजपणे साकारण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्यापैकी एक म्हटले जात आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील तज्ज्ञ सर्वजण हेच मत व्यक्त करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' Breaks Records, Fastest to ₹1000 Crore!

Web Summary : Ranveer Singh redefines box office dominance with 'Dhurandhar 2', the fastest to ₹1000 crore. This blockbuster solidifies his position as a top star, surpassing previous records and setting new benchmarks in Indian cinema with impressive collections and acclaimed performance.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंग