Chaudhary Aslam Connection To Sanjay Dutt : दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याने साकारलेली 'चौधरी अस्लम' ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मात्र, या भूमिकेमागे एक अत्यंत रंजक योगायोग दडलेला आहे. ज्या व्यक्तीवर ही भूमिका आधारित आहे, तो अधिकारी खऱ्या आयुष्यात संजय दत्तचा 'जबरा फॅन' होता.
चित्रपटात संजय दत्तने एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारले आहे, जे कराचीतील रिअल लाइफ पोलीस ऑफिसर चौधरी अस्लम यांच्यावरून प्रेरित आहे. विशेष म्हणजे, चौधरी अस्लम हे संजय दत्तचे इतके मोठे चाहते होते की, त्यांचे सहकारी त्यांना प्रेमाने 'बाबा कॉप' (Baba Cop) या नावाने हाक मारत असत. 'खलनायक' चित्रपट पाहिल्यानंतर ते संजय दत्तच्या शैलीने प्रभावित झाले होते आणि त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेतही ती झलक पाहायला मिळत असे.
१९६३ मध्ये जन्मलेले अस्लम १९८० च्या दशकात पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी कराचीमधील 'ल्यारी' सारख्या अत्यंत धोकादायक भागात गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी 'ल्यारी टास्क फोर्स'चे नेतृत्व केले. त्यांच्या धाडसामुळे त्यांना 'तालिबान हंटर' असेही म्हटले जाई. २०११ मध्ये एका भीषण हल्ल्यातून ते थोडक्यात वाचले होते, मात्र २०१४ मध्ये 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) ने घडवून आणलेल्या एका बॉम्बस्फोटात त्यांची हत्या करण्यात आली.
'धुरंधर २' मधील संजय दत्तचा जलवाआदित्य धर यांनी या चित्रपटात 'ऑपरेशन ल्यारी' आणि गुप्तचर मोहिमांचे शुटिंग अत्यंत वास्तववादी पद्धतीने केले आहे. संजय दत्तने ही बहुआयामी भूमिका साकारताना अस्लम यांच्या व्यक्तिमत्त्वातील तोच दरारा पडद्यावर उतरवला आहे. दरम्यान, "खऱ्या आयुष्यातील अस्लम हे चित्रपटातील पात्रापेक्षाही अधिक धाडसी होते" असे मत सिनेसमीक्षकांनी व्यक्त केले आहे.
Web Summary : Sanjay Dutt's 'Dhurandhar 2' character, Chaudhary Aslam, is based on a real Pakistani police officer who was a huge Sanjay Dutt fan. This officer, known as 'Baba Cop', admired Dutt's style after 'Khalnayak' and bravely fought Karachi's criminals before his assassination in 2014.
Web Summary : संजय दत्त का 'धुरंधर 2' का किरदार, चौधरी असलम, एक वास्तविक पाकिस्तानी पुलिस अधिकारी पर आधारित है जो संजय दत्त के बहुत बड़े प्रशंसक थे। 'बाबा कॉप' के नाम से जाने जाने वाले इस अधिकारी ने 'खलनायक' के बाद दत्त की शैली की प्रशंसा की और 2014 में अपनी हत्या से पहले कराची के अपराधियों से बहादुरी से लड़ाई लड़ी।