Dhurandhar 2: 'धुरंधर २' प्रदर्शित व्हायला अवघे २ दिवस बाकी आहेत. पहिल्या भागापासूनच 'धुरंधर २'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता 'धुरंधर २'मधल्या एका अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. 'धुरंधर २'च्या ट्रेलरवरील एका डायलॉगवरुन वाद निर्माण झाला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच "हिंदू बहुत डरपोक कौम है...पडोस मे रहते है हम गुद्दे भर का जोर लगाओ और बिगाड लो जो बिगाड सकते हो" असा डायलॉग पाहायला मिळतो. हा डायलॉग बोलणाऱ्या अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
या अभिनेत्याचं नाव विवेक सिन्हा असं आहे. 'धुरंधर २'मध्ये त्याने पाकिस्तानी दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. विवेकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने 'धुरंधर २'मधील त्याच्या डायलॉगची रील बनवण्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. मात्र या रीलमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत असून कमेंटमध्ये जीवे मारण्याच्या धमक्याही येत आहेत.
जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर विवेक सिन्हाने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलं आहे की "मी काल एक व्हिडीओ टाकला होता. 'धुरंधर २'मधल्या डायलॉगवर रील बनवायला सांगितली होती. त्यावर तुमचा एवढा राग...म्हणजे एवढे कमेंट... प्रत्येक कमेंटमध्ये हेच बोललं जात आहे की तुझा चेहरा आतंकवाद्यासारखा दिसतोय. तुला मारायची इच्छा होत आहे, अशा कमेंट्स आहेत. पण मला खरंच छान वाटलं. कारण ही आपल्यातली देशभक्ती आहे. या देशभक्तीला मी सलाम करतो".
"एक जण म्हणाला की तुला पाकिस्तानात येऊन मारेन. तर मी सांगू इच्छितो की मी पाकिस्तानचा नाही. तर मी बिजनौरचा आहे आणि सध्या मुंबईत राहतो. तुम्हाला मला शिव्या देण्याची इच्छा होत असेल तर तसंही करा", असंही विवेक सिन्हाने म्हटलं आहे. 'धुरंधर २'मध्ये विवेक सिन्हाने जहूर मिस्त्री हे पात्र साकारलं आहे. १९ मार्चला 'धुरंधर २' सगळीकडे प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Summary : Vivek Sinha, playing a Pakistani terrorist in 'Dhurandhar 2,' received death threats after a dialogue in the trailer sparked controversy. Sinha shared a video addressing the threats, expressing appreciation for the patriotism behind the reactions. The film releases on March 19th.
Web Summary : धुरंधर 2' में पाकिस्तानी आतंकवादी की भूमिका निभाने वाले विवेक सिन्हा को ट्रेलर के एक डायलॉग पर विवाद के बाद जान से मारने की धमकी मिली। सिन्हा ने एक वीडियो साझा कर प्रतिक्रियाओं के पीछे देशभक्ति की सराहना की। फिल्म 19 मार्च को रिलीज होगी।