Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2: साऊथच्या सिनेमाला 'धुरंधर २'ने चारली धूळ! 'KGF 2'चा रेकॉर्ड मोडला, एकूण कलेक्शन किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:47 IST

आता 'धुरंधर २'ने साऊथच्या सिनेमाला धूळ चारली आहे. 'धुरंधर २'ने 'केजीएफ २'चा रेकॉर्डही चक्काचूर केला आहे.  

Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेल्या 'धुरंधर २'ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट पळत आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड 'धुरंधर २'ने मोडले. आता 'धुरंधर २'ने साऊथच्या सिनेमाला धूळ चारली आहे. 'धुरंधर २'ने 'केजीएफ २'चा रेकॉर्डही चक्काचूर केला आहे.  

'धुरंधर २'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'धुरंधर २'ने दुसऱ्या सोमवारी तब्बल २५.३० कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशीच या सिनेमाने पेड प्रीव्ह्यूसोबत एकूण १४५ कोटींचा बिजनेस केला होता. १२ दिवसांत 'धुरंधर २'ने भारतात ८७२ कोटी कमावले आहेत. लवकरच हा सिनेमा ९०० कोटींचा आकडा गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

'धुरंधर २'ने मोडला KGF 2चा रेकॉर्ड! 

'धुरंधर २'ने साऊथ केजीएफ २चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 'धुरंधर २'ने १२ दिवसांत ८७२ कोटी कमावले आहेत. तर केजीएफ २चं लाइफटाइम कलेक्शन हे ८६० कोटी इतकं आहे. आता 'धुरंधर २' बाहुबली २ आणि पुष्पा २चा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. 

'धुरंधर २'ची स्टार कास्ट

पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या आणि तिथल्या दहशतवादी कारवायांची माहिती भारताला गुप्त पद्धतीने देणाऱ्या भारतीय गुप्तहेराची कहाणी 'धुरंधर' मध्ये दाखवण्यात आली होती. याच सिनेमाचा 'धुरंधर २' हा सीक्वल आहे. या सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन, राकेश बेदी, अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' Outperforms South Films, Breaks 'KGF 2' Record!

Web Summary : 'Dhurandhar 2' is a box office hit, surpassing 'KGF 2' collections. The film earned ₹872 crores in India within 12 days. Starring Ranveer Singh and Sanjay Dutt, it's poised to break more records, potentially exceeding ₹900 crores soon.
टॅग्स :धुरंधर सिनेमाबॉक्स ऑफिस कलेक्शनरणवीर सिंग