बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या येत होत्या. हे ऐकून त्यांचे चाहते खूप चिंतेत पडले होते. मात्र, आता त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल हिने पोस्ट शेअर करून स्पष्ट केले आहे की, त्यांची तब्येत ठीक आहे आणि ते बरे होत आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर येताच ईशा देओलने लगेचने पोस्ट करून ही माहिती चुकीचं असल्याचं सांगितलं. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, "माझ्या वडिलांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की, आमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा. बाबा लवकर बरे व्हावेत यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद."
ईशाच्या पोस्टनंतर हेमा मालिनी यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्तांना फेटाळून लावलं. एक्स अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, या गोष्टीसाठी क्षमा नाही! उपचार घेत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार वाहिन्या खोटी बातमी कशी पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरयुक्त आणि गैरजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंब आणि त्यांच्या प्रायव्हसीचा योग्य आदर करा.
धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना सोमवार, १० नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्येकजण ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे.
Web Summary : Amidst false death rumors, Dharmendra is recovering. Hema Malini and Esha Deol have confirmed his well-being, urging respect for family privacy. He was admitted to Breach Candy Hospital on November 10th and is receiving treatment.
Web Summary : धर्मेंद्र के निधन की झूठी खबरों के बीच, हेमा मालिनी और ईशा देओल ने उनके स्वास्थ्य की पुष्टि की है। परिवार की गोपनीयता का सम्मान करने का आग्रह किया है। उन्हें 10 नवंबर को ब्रीच कैंडी अस्पताल में भर्ती कराया गया है और उनका इलाज चल रहा है।