Join us

'अ‍ॅनिमल' रिलीज झाल्यानंतर बॉबी देओलची वाढलेली लोकप्रियता पाहून हैराण झाले होते धर्मेंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 15:39 IST

Bobby Deol : बॉबी देओलने 'ॲनिमल'च्या रिलीजनंतर वडील धर्मेंद्र यांची रिअ‍ॅक्शन काय होती, ते सांगितले.

'अ‍ॅनिमल' (Animal Movie) सिनेमा चांगलाच गाजला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली. रणबीर कपूर, तृप्ती डिमरी, रश्मिका मंदाना यांच्यासोबत बॉबी देओल(Bobby Deol)ची भूमिका जास्त लोकप्रिय झाली. बॉबीने 'ॲनिमल'च्या यशानंतर वडील धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यासोबत घालवलेल्या सर्वोत्तम क्षणांबद्दल सांगितले. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'(The Great Indian Kapil Show)च्या आगामी भागात देओल बंधू सनी (Sunny Deol) आणि बॉबी खास पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे. हा एपिसोड रिलीज होण्यापूर्वीच इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या शोमधील संभाषणादरम्यान, बॉबीने त्याच्या वडिलांबद्दल एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला. 

रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' या चित्रपटात अबरारची भूमिका साकारणारा बॉबी म्हणाला, "प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंद पाहायचा आहे आणि मी नेहमीच माझ्या वडिलांकडे आदराने पाहिले आहे. मी एका आठवड्यानंतर घरी परतलो आणि माझ्या वडील इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना त्यांनी मला थांबवले आणि मग म्हणाले की, 'बॉब, लोक तुझ्यासाठी वेडे आहेत!' आणि मी उत्तर दिले, 'अखेर, मी तुमचा मुलगा आहे... ते माझ्याबद्दल वेडे का नाही होणार?'

देओल ब्रदर्सने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

या एपिसोडमध्ये देओल ब्रदर्स जुन्या आठवणींना उजाळा देताना आणि अलीकडच्या यशाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानताना दिसणार आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' दर शनिवारी नेटफ्लिक्सवर येतो. या एपिसोडमध्ये सनी देओलनेही आपल्या मनातील भावना शेअर केल्या आहेत. सनीने त्याच्या बदलत्या काळाचे श्रेय त्याचा मुलगा करण देओलच्या पत्नीला म्हणजेच त्याच्या सुनेला दिले. 

सनीने एपिसोडमध्ये सांगितले की, 'लग्नाच्या आधी वडिलांचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' रिलीज झाला होता... नंतर गदर आणि त्यानंतर ॲनिमल रिलीज झाला. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. मला माहित नाही की देव कुठून आला आणि सर्व काही ठीक चालले आहे. या एपिसोडमध्ये खूप धमाल पाहायला मिळणार आहे. कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर हे दोघेही धर्मेंद्रच्या लूकमध्ये दिसणार आहेत.

टॅग्स :बॉबी देओलसनी देओलकपिल शर्मा धमेंद्र