Join us  

Animal मधील बॉबी देओलचा अवतार पाहून वडील धर्मेंद्र म्हणतात, 'माझा निरागस...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 8:58 AM

वडिलांना लेकाचा अभिमान, काय म्हणाले धर्मेंद्र?

सध्या बॉलिवूडमधअये एकापेक्षा एक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत. 'पठाण', 'जवान', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे चित्रपट तर येऊन गेले आता प्रतिक्षा आहे ती 'फायटर', 'गणपत', 'अॅनिमल' या सिनेमांची. रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये त्याचा धाँसू अवतार प्रेक्षकांना भलताच आवडला. पण रणबीरपेक्षाही जास्त चर्चा होतीये ती बॉबी देओलची. होय, बॉबीचा फिटनेस आणि शर्टलेस लुक पाहून प्रेक्षक अवाक झालेत.

बॉबीच्या लुकवर वडील धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया 

अॅनिमल टीझरच्या अगदी शेवटी बॉबी देओलची एक झलक दाखवली आहे. कोणताही डायलॉग नाही फक्त शर्टलेस अवतार आणि कडक लूकने त्याने सर्वांना एका सेकंदातच प्रेमात पाडलं. टीझरमधील बॉबीही झलक पाहून वडील धर्मेंद्र यांना चांगलाच अभिमान वाटतोय. व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले,'माझा निरागस मुलगा अॅनिमलमध्ये...'

धर्मेंद्र यांना दोन्ही लेकांचा खूपच अभिमान वाटतोय. एकीकडे सनी देओलच्या 'गदर 2' ला मिळालेलं यश आणि आता बॉबीचंही सिनेमातील जबरदस्त कमबॅक पाहून ते खूश झालेत. धर्मेंद्र स्वत: देखील सिनेमात अॅक्टिव्ह झालेत. 'रॉकी और रैनी की प्रेम कहानी' चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यामुळे सध्या देओल कुटुंबीय चर्चेत आहे हे मात्र नक्की.

Animal मधील बॉबीचा लुक पाहून सनी म्हणतो, 'यानंतर कोणताच हिरो व्हिलनसमोर...'

'अॅनिमल' हा सिनेमा संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओलची भूमिका आहे. बॉबी यामध्ये खलनायकाचे पात्र साकारतोय. १ डिसेंबरला सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होतोय.

टॅग्स :धमेंद्रबॉबी देओलसनी देओलरणबीर कपूर