Join us

Dharmendra: "ते लवकर बरे व्हावेत...", धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसाठी रितेश देशमुखची प्रार्थना, अभिनेता झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:59 IST

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत समजताच अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात जात त्यांची भेट घेतली. अभिनेता रितेश देशमुखने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. 

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते आणि सेलिब्रिटी प्रार्थना करत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत, अशी माहिती त्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत समजताच अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात जात त्यांची भेट घेतली. अभिनेता रितेश देशमुखने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. 

रितेश देशमुखने पापाराझींशी संवाद साधला. धर्मेंद्र यांच्याबद्दल विचारताच रितेश भावुक झाल्याचं दिसलं. "त्यांच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करत आहे. लवकरात लवकर ते बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो", असं रितेश देशमुख म्हणाला. धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना रितेश भावुक झाल्याचं दिसलं. 

धर्मेंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत रुग्णालयात असून, त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आल्याची माहिती आहे.  त्यांच्या मुली मंगळवारी सकाळी मुंबईत पोहोचतील. सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काहींनी हॉस्पिटलला भेट देऊन देओल कुटुंबियांना या संकटातून मार्ग निघेल असा दिलासा दिला. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish Deshmukh prays for Dharmendra's health; actor gets emotional.

Web Summary : Veteran actor Dharmendra is undergoing treatment. Riteish Deshmukh prayed for his speedy recovery, expressing his emotions. His family is with him, and daughters are arriving from the US. Hema Malini and Esha Deol reported improvement in his health.
टॅग्स :धमेंद्ररितेश देशमुख