Join us

देसी गर्लची नाईट आऊट पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 17:26 IST

आता ती केवळ बॉलिवूडचीच नव्हे तर हॉलिवूडचीही फेव्हरेट बनत आहे. दवेने जॉनसन पासून ते टॉम हिडलस्टनपर्यंत सर्वजण तिचे फॅन होत आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर दोघींचाही पार्टी करतानाचा फोटो शेअर केला आहे. ‘गर्ल्स जस्ट वना हॅव फन.’ असे तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या खुप बिझी आहे म्हणे. ‘क्वांटिको’चे दुसरे सीझन ती शूट करतेय. पण, तिला इतकी बिझी राहायची सवय झाली आहे की, थोडाही वेळ मिळाला की ती लगेचच त्याचा उपयोग करून घेते. आता हेच पाहा ना.. तिला चित्रीकरणातून थोडा वेळ मिळाला म्हणून तिने प्रिन्स हॅरीची गर्लफ्रेंड मेघन मार्कलसोबत नाईट आऊट पार्टी केली. आता ती केवळ बॉलिवूडचीच नव्हे तर हॉलिवूडचीही फेव्हरेट बनत आहे. दवेने जॉनसन पासून ते टॉम हिडलस्टनपर्यंत सर्वजण तिचे फॅन होत आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर दोघींचाही पार्टी करतानाचा फोटो शेअर केला आहे. ‘गर्ल्स जस्ट वना हॅव फन.’ असे तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे. प्रियांका चोप्रा हिच्या करिअरचा आलेख जर पाहिला तर तिची वाटचाल खरंच खुप प्रेरणादायी आहे. घरातून फिल्मी बॅकग्राऊंड नाही, केवळ परिश्रम, सचोटी, जिद्द आणि चाहत्यांचे प्रेम या बळावर तिने हॉलिवूडमध्येही स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ जेव्हापासून तिने करायला सुरूवात केली तेव्हापासून तिच्या करिअरने झेप घेतली. जगाच्या पाठीवर तिचे नाव करण्याची संधी तिला मिळाली.