Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटो काढण्यासाठी देसी गर्लने छोट्या फॅन्सबरोबर दिल्या पोज, प्रियांकाचं होतंय कौतुक, चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 13:07 IST

प्रियांकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. 

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा कायमच चर्चेत असते. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रियांकाने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आता देसी गर्लने तिच्या कृत्याने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. प्रियांकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. 

प्रियांका नुकतीच कामानिमित्त भारतात आली आहे. एका इव्हेंटसाठी प्रियांका बुधवारी रात्री मायदेशी परतली. या इव्हेंटदरम्यानचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वरिंदर चावला या पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रियांकाचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत प्रियांका तिच्या छोट्या चाहत्यांबरोबर फोटो काढताना दिसत आहे. प्रियांकाने तिच्या छोट्या चाहत्यांना दिलेली ही वागणूक पाहून चाहते खूश झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट अभिनेत्रीच्या या कृतीचं कौतुक होत आहे. 

प्रियांका सध्या 'सिटाडेल' या वेब सीरिजच्या नव्या सीझनचं शूटिंग करत आहे. तसंच 'पाणी' या मराठी सिनेमामुळेही ती चर्चेत आहे. आदिनाथ कोठारेच्या या सिनेमाची निर्मिती प्रियांकाने केली आहे. या सिनेमातून बायकोसाठी गावात पाणी आणणाऱ्या हनुमंत केंद्रे या लढवय्याची खरी कहाणी मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटी