देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या भारतात असून, आपल्या परिवारासमवेत ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी करीत आहे. प्रियंका भारतात येताच दोन-तीन विषयांवरून चर्चेत आली आहे. त्यातीलच एक विषय प्रियंकाच्या लग्नाचा आहे. खरं तर सुरुवातीला प्रियंका लग्नाच्या विषयावर नाराज असायची. परंतु जेव्हा तिला झी सिने अवॉर्डमध्ये लग्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने यावर बिंधास्तपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रियंकाला विचारण्यात आले की, विराट आणि अनुष्काने लग्न केले, मग तू लग्न केव्हा करणार?
प्रियंकाने या प्रश्नाचे उत्तर हसत हसत देणे पसंत केले. तिने म्हटले की, मला लग्नासाठी अजूनपर्यंत योग्य वर मिळाला नाही. मला योग्य वर मिळताच मी त्याच्याशी लगेचच लग्न करेल. पुढे माध्यम प्रतिनिधींनी याच विषयाच्या अनुषंगाने तिला उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यावर प्रियंकाने म्हटले की, ‘डायरेक्ट पुछो न यार, घुमा फिरा कर पुछने की जरूरत नहीं है’ प्रियंकाने म्हटले की, लग्न करण्यासाठी कुठलाही प्लान करण्याची गरज नाही. जो व्यक्ती माझ्या लायक आहे, तो भेटल्यास मी नक्कीच लग्न करणार.
यावेळी प्रियंका चोपडाने ‘पद्मावती’ वादावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बाजूने बोलताना एकप्रकारे पद्मावतीचे समर्थन केले. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात भन्साळीसोबत काम करणाºया प्रियंकाने म्हटले की, ‘मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. मला माहीत आहे की, हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट बघू शकतील याविषयी मला पूर्ण खात्री आहे. मी ‘पद्मावती’चे समर्थन करते.
आपल्या प्रोजेक्ट्विषयी सांगतांना प्रियंकाने म्हटले की, ‘लवकरच क्वांटिकोच्या पुढच्या सीजनला सुरुवात करणार आहे.’ मात्र प्रियंकाने बॉलिवूड चित्रपटांविषयी यावेळी कुठल्याही प्रकारची घोषणा केली नाही.
देसी गर्ल प्रियंका चोपडाने लग्न केव्हा करणार असे विचारताच दिले ‘हे’ उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 21:11 IST