Join us  

Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाने सोशल मीडियावर रचला आगळा-वेगळा विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:17 AM

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे लग्न यंदाचे सर्वाधिक चर्चित लग्न आहे, यात शंका नाही. सोशल मीडियावर तर दीपवीरच्या लग्नाचीच धूम आहे. काल १४ नोव्हेंबरला दोघांनीही कोंकणी पद्धतीने लग्न केले. आज हे नवदांम्पत्य सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे.

ठळक मुद्देरणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे लग्न यंदाचे सर्वाधिक चर्चित लग्न आहे, यात शंका नाही. काल १४ नोव्हेंबरला दोघांनीही कोंकणी पद्धतीने लग्न केले.आज हे नवदांम्पत्य सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. दोघांच्याही लग्नाचा अद्याप एकही फोटो समोर आलेला नाही. पण चाहते उत्सूक आहेत.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे लग्न यंदाचे सर्वाधिक चर्चित लग्न आहे, यात शंका नाही. काल १४ नोव्हेंबरला दोघांनीही कोंकणी पद्धतीने लग्न केले. आज हे नवदांम्पत्य सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. दोघांच्याही लग्नाचा अद्याप एकही फोटो समोर आलेला नाही. पण चाहते उत्सूक आहेत. सगळ्या देशाला लग्नाचे फोटो पाहण्याची घाई झाली आहे. सोशल मीडियावर तर दीपवीरच्या लग्नाचीच धूम आहे. सोशल मीडियावर या रॉयल वेडिंगचे इतके हॅशटॅग्स बनले आहेत की, आत्तापर्यंत कुठल्याही बॉलिवूड वेडिंगमध्ये बनले नाहीत. रणवीर व दीपिकाच्या लग्नाचे फोटो आणि माहिती शेअर करण्यासाठी चाहत्यांनी  #DeepikaKiShadi, #RanveerWedding, #DeepikaWedding, #DeepikaPadukone, #RanveerSingh, #DeepVeerKiShaadi, #DeepVeer, #RanveerWedsDeepia असे अनेक हॅशटॅग बनवले आहेत. इतकेच नाही तर  #LadkiWale #LadkeWale  या हॅशटॅग्सवर फोटोही शेअर होत आहेत.दीपिका व रणवीरने आपल्या लग्नाचे फोटो शेअर होऊ नयेत, यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. इटलीतील लेक कोमोमधील वेडिंग मेन्यूवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांच्या मोबाईल कॅमे-याला स्टिकर लावण्यापासून तर ड्रोनवर बंदी घालण्यापर्यंतचा सगळा चोख बंदोबस्त होता. अर्थात याऊपरही दीपवीरच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झालेत. पण ते अस्पष्ट आहेत.आज इटलीच्या अलिशान विलात रणवीर-दीपिकाचा ‘आनंद कारज’ विधी संपन्न होणार आहे. ‘आनंद कारज’ हा विधी दिवसा होतो. पारंपरिक हिंदू विवाहात लग्न, मुहूर्त, पत्रिका मिळवणे गरजेचे मानले जाते. ‘आनंद कारज’मध्ये प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो.‘आनंद कारज’चा विधीत गुरुग्रंथ साहिबचा पाठ केला जातो. यादरम्यान सर्वांच्या डोक्यावर पगडी अर्थात सरापा असतो. ‘आनंद कारज’नंतर दीपवीर सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग