Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका-शाहीदच्या ‘या’ संवादाने भडकणार तर नाही ना रणवीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 12:38 IST

दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांच्यात सध्या काहीही ‘आॅल-वेल’नाही, ही खबर तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे. दीपिकाच्या दुर्लक्षितपणामुळे रणवीर नाराज ...

दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांच्यात सध्या काहीही ‘आॅल-वेल’नाही, ही खबर तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे. दीपिकाच्या दुर्लक्षितपणामुळे रणवीर नाराज असल्याचे कळतेयं. आता या नाराजीत आणखी भर पडण्याची भीती आम्हाला सतावतेय. होय, दीपिका व शाहीद कपूर यांचा twitterवर रंगलेला संवाद बघून रणवीर नाराज होऊ शकतो. दीपिकाने अलीकडे सलमानच्या ‘बिग बॉस’मध्ये ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या तिच्या पहिल्या-वहिल्या हॉलिवूडपटाचे ट्रेलर लॉन्च केले. या ट्रेलरमध्ये दीपिका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात आहे. या ट्रेलरनंतर दीपिकावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. शाहीदनेही हा ट्रेलर पाहिला आणि त्याने लगेच दीपिका twitterवर शुभेच्छा दिल्या. ‘ट्रिपल एक्समधील तुझा अभिनय बघून मला तुझा अभिमान वाटतोय...’असे शाहीदने म्हटले. शाहीदच्या या tweetला दीपिकाने लगेच उत्तर दिले. तिने केवळ शाहीदचे आभारच मानले नाहीत तर त्याला ‘साशा’(शाहीदचे निकनेम) असे संबोधले. शिवाय तीन ‘किस’ करणा-या ‘इमोजी’ही पाठवल्या. आता या ‘किस’ करणा-या ‘इमोजी’पाहून रणवीर भडकू नये म्हणजे झाले...!!