Join us  

Deepika Ranveer Wedding: दीपिकाच्या लग्नामुळे हिरमुसला ‘बऊआ सिंह’! गमती-गमतीत बोलून गेला असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 1:17 PM

कालपासून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांपासून करण जोहर, निमरत कौर, कपिल शर्मा यांनीही आपल्या खास अंदाजात दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूडचा किंगखान मात्र या जोडप्याच्या लग्नामुळे थोडा हिरमुसला आहे.

ठळक मुद्दे किंगखान शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. या चित्रपटात शाहरूख बऊआ सिंहचे पात्र साकारतोय. या बऊआ सिंहचेही एक ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे.बऊआ सिंह असा काही बोलला की,रणवीर व दीपिका यांनाही धक्का बसेल.

बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित कपल्सपैकी एक दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आज गुरुवारी सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. काल बुधवारी त्यांनी कोंकणी पद्धतीने विवाह केला आणि दोघेही पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकले. कालपासून दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांपासून करण जोहर, निमरत कौर, कपिल शर्मा यांनीही आपल्या खास अंदाजात दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बॉलिवूडचा किंगखान मात्र या जोडप्याच्या लग्नामुळे थोडा हिरमुसला आहे.होय, विश्वास बसत नसेल तर खालची पोस्ट तुम्ही पाहायलाचं हवी. होय, किंगखान शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. या चित्रपटात शाहरूख बऊआ सिंहचे पात्र साकारतोय. या बऊआ सिंहचेही एक ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. या अकाऊंटवरून शाहरुख बऊआ सिंह बनून चाहत्यांशी संवाद साधतोय. याच अकाऊंटवरून शाहरुखने पहिल्यांदा दीपवीरच्या लग्नाबद्दल बोलला. होय, शाहरुख उर्फ बऊआ सिंह असा काही बोलला की,रणवीर व दीपिका यांनाही धक्का बसेल.

त्याचे झाले असे की, काल ‘झिरो’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकाणा-या जीशान अयूबने बऊआ सिंहला बालदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावर रिप्लाय देत, बऊआ सिंहने जीशानला धन्यवाद म्हटले. पण बऊआच्या या पोस्टवर जीशान पुन्हा बोलला. ‘अबे हाईट तो कम है ही, अब उमर भी कम करना चाह रहा है,’ असे जीशानने लिहिले. यावर बऊआने काय उत्तर द्यावे? ‘उमर तो आज पूरी खत्म हो गई गुड्डू. दीपिका पादुकोणने शादी कर ली है...लेगा क्या लिटिल लिटिल...’ असे त्याने लिहिले.तुम्हाला ठाऊक आहेच की, शाहरूखनेच दीपिकाला लॉन्च करण्याचा जिम्मा उचलला होता. शाहरूखच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला होता.

टॅग्स :दीप- वीरशाहरुख खानदीपिका पादुकोणरणवीर सिंग